आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोपीचंद पडळकरांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार:एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले याचे पवार कुटुंबाला दु:ख

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले याचे पवार कुटुंबाला दु:ख आहे. सुप्रिया ताईंना कोणी मोठे झालेले पाहावत नाही, अशा शब्दात भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर पलटवार केला. आज सकाळी माध्यमांशी बोलतना सुप्रिया सुळे यांनी 'राज्यातील सत्ताधाऱ्यांनी 50 खोके घेऊन लाल दिवा ओरबाडून मिळवला,' अशा तिखट शब्दांत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला होता.

गोपीचंद पडळकर म्हणाले की, आपले वडिल हेच राज्यातले मुख्य आहेत. तेच राज्यात काही बदल करू शकतात, असा सुप्रिया ताईंचा समज आहे. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छेद दिला आणि त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साथ दिली. सामान्य मराठा कुटुंबातील एक चांगला चेहरा राज्याचा मुख्यमंत्री झाला हे पवार कुटुंबाचे सर्वांत मोठे दु:ख आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री खूप चांगल्याप्रकारे काम करत आहेत. त्यामुळे त्यांना हे सहन होत नाहीये.

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?

माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवरही टीकेचे बाण सोडले होते. त्या म्हणाल्या की, ओरबाडून 50 खोके घेत साम-दाम-दंड-भेद वापरून सरकार सत्तेत आणले. त्यामागे उत्साह फक्त लाल दिव्याच होता. गेल्या अडीच महिन्यात कामे त्या वेगाने चालली नाहीत. त्यांचे दौरे ही फक्त एक किलोमीटरच्या आतमध्ये असतात. मागच्या अडीच महिन्यांपासून जिल्ह्यांना पालकमंत्री नाही. सत्ताधाऱ्याना सर्वसामान्य जनतेची सेवा करायची नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नेहमीच कुणाच्यातरी घरी दिसतात

बातम्या आणखी आहेत...