आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीकेचे बाण:गोपीचंद पडळकरांचे शरद पवारांवरील वक्तव्य हे फडणवीस किंवा त्यांच्या भाजपची ‘मन की बात’ तर नाही ना? शिवसेनेचे टीकास्त्र

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गोपीचंदच्या करामतींमुळे भाजपवर गावागावात चपलांचा प्रसाद खाण्याची वेळ
  • गोपीचंद हे राजकारणामधील कच्चे मडके आहे हे माहीत होते, पण कच्चे मडके फुटकेदेखील आहे हे आता सिद्ध झाले.
  • बिळातला बिनविषारी साप जोरात डंख मारतो तसे पडळकरांनी केले.

भाजपाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. सर्वच स्तरातून पडळकर यांच्याविरोधात तीव्र भावना व्यक्त होत होत्या. आता शिवसेनेनेही गोपीचंद पडळकरांवर निशाणा साधला आहे. गोपीचंद पडळकर यांनी पवारांबाबत जे घाणेरडे वक्तव्य केले ते फडणवीस किंवा त्यांच्या भाजपाची ‘मन की बात’ तर नाही ना, अशी शंका घेण्यास वाव आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. शिवसेनेच्या सामना अग्रलेखातून गोपीचंद पडळकरांसह भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. 

...त्यामुळे भाजपवर गावोगाव जोडे खाण्याची वेळ  

लडाखमधील गलवान खोर्‍यात ‘बिहार रेजिमेंट’ने शौर्य गाजवले असे पंतप्रधान मोदी यांनी काल सांगितले. देशावर यापूर्वी संकटे आली तेव्हा महार, मराठा, रजपूत, शीख, गुरखा, डोग्रा रेजिमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या काय? पुलवामात कालच महाराष्ट्राचे वीरपुत्र सुनील काळे शहीद झाले, पण बिहारात निवडणुका आहेत म्हणून सैन्य दलातील ‘जात’, ‘प्रांत’ यास महत्त्व आणले जात आहे. हे असे राजकारण म्हणजे कोरोनापेक्षा भयंकर गजकर्ण आहे! महाराष्ट्रात हा गजकर्ण खाजवण्याचे काम विरोधी पक्ष करीत आहे. त्यामुळे गावोगाव जोडे खाण्याची वेळ भाजपवर आली. हे सुधारणार कधी तेच कळत नाही. असा टोला सामाना अग्रलेखातून लगावण्यात आला आहे. 

फडणवीस किंवा त्यांच्या भाजपची ‘मन की बात’ तर नाही ना?

गोपीचंद जासूस नावाचा हिंदी सिनेमा पूर्वी येऊन गेला. या गोपीचंदाच्या अनेक करामती पडद्यावर दिसल्या. भारतीय जनता पक्षाने त्यांच्या राजकीय पडद्यावर नवा गोपीचंद आणला असून या गोपीचंदच्या करामतींमुळे भाजपवर गावागावात चपलांचा प्रसाद खाण्याची वेळ आली आहे. एकनाथ खडसे यांना मागे ठेवून देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांना आमदार केले त्या गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर फार घाणेरड्या शब्दांत भडास व्यक्त केली आहे व त्याचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. भाजपचे गोपीचंद हे काही राजकारण किंवा समाजकारणातले महान व्यक्तिमत्त्व नाही, पण देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजातील एक धडपड्या तरुण म्हणून त्यांना भाजपच्या सोयीसाठी वापरले आहे. त्यामुळे गोपीचंद महाशयांनी पवारांबाबत जे घाणेरडे वक्तव्य केले ते फडणवीस किंवा त्यांच्या भाजपची ‘मन की बात’ तर नाही ना, अशी शंका घेण्यास वाव आहे. असा संशयही शिवसेने अग्रलेखातून व्यक्त केला आहे. 

गोपीचंद हे राजकारणामधील कच्चे मडके

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना असल्याच्या गुळण्या गोपीचंदने टाकल्या. ‘श्री. पवार यांनी बहुजन समाजावर नेहमीच अन्याय केला असून छोट्या समूहांना भडकवायचे आणि लढवायचे हे धोरण राबविले’, असे हे गोपीचंद महाशय म्हणतात. ‘पवारांकडे विचारधारा नाही, व्हिजनही नाही आणि अजेंडा नाही’, असे मनाचे श्लोकही गोपीचंद यांनी म्हटले आहेत. गोपीचंद यांनी ही जी विधाने पवारांबाबत केली ती भाजपच्या काही नेत्यांनी अधूनमधून केलीच आहेत. गोपीचंद हे राजकारणामधील कच्चे मडके आहे हे माहीत होते, पण कच्चे मडके फुटकेदेखील आहे हे आता सिद्ध झाले. असे टीकास्त्र सामनाच्या माध्यमातून पडळकरांवर सोडण्यात आले आहे. 

महाशयांचा अजेंडा, व्हिजन वगैरेबाबत गोंधळ

बिळातला बिनविषारी साप जोरात डंख मारतो तसे पडळकरांनी केले. पडळकरांनी सांगलीमध्ये भाजपविरोधात निवडणूक लढवली. ‘भाजपला मत देऊ नका. मी भाजपसाठी कधी मत मागायला आलो तर जोड्याने मारा मला,’ असे हेच पडळकर तेव्हा सांगत. पुढे हेच पडळकर भाजपमध्ये आले व बारामतीत अजित पवारांच्या विरोधात भाजपचे उमेदवार झाले. पण बारामतीत धनगर समाज मोठ्या प्रमाणात असूनही पडळकरांची अनामत रक्कम जप्त झाली. त्यामुळे या महाशयांचा अजेंडा, व्हिजन वगैरेबाबत गोंधळ आहे. 

बातम्या आणखी आहेत...