आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनावणी:गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याची सुनावणी 27 फेब्रुवारीला

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी पुढील सुनावणी २७ फेब्रुवारीला होणार आहे. आरोप निश्चित करण्यासाठी मंगळवारी मुंबईतील विशेष न्यायालयात सुनावणी होती. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि प्रवीण राऊत हे सुनावणीसाठी न्यायालयात पोहोचले होते. मात्र, तपास यंत्रणेने इतरांचा समन्स अहवाल सादर न केल्यामुळे आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. गोरेगावमध्ये गुरुआशिष कंपनीला चाळीच्या पुनर्विकासाचे काम देण्यात आले होते. गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थनगर भागातील या झोपडपट्टीचे काम न करताच परस्पर काही वर्षांपूर्वी इथला एफएसआय बेकायदेशीररीत्या विकण्यात आला. जवळपास १ हजार कोटी रुपयांचा होता. एचडीआयएलच्या प्रमोटर्सना पैशांची अफरातफर करण्यात मदत केली, असा आरोपही प्रवीण राऊत यांच्यावर आहे. प्रवीण राऊत यांच्या पीएमसी बँकेतील खात्यातून खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर १२ वर्षांपूर्वी ५० लाख जमा केले होते.

बातम्या आणखी आहेत...