आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Goregaon Raswanti Owner Murder | Murder In Goregaon | Marathi News | Rajasthan's Raswanti Driver Murdered In Goregaon, Search For Three Continues

लाकडी दांड्याने वार करीत खून:राजस्थानच्या रसवंती चालकाचा गोरेगावमध्ये खून, तिघांचा शोध सुरू

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे राजस्थानच्या रसवंती चालकाचा लोखंडी सराटा व तसेच लाकडी दांड्याने वारकरीत खून केल्याची घटना बुधवारी ता. ६ पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. लादूलाल तेली साहू (४२, रा. भिलवाडा) असे या तरुणाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भीलवाडा येथील लादुलाल तेली हे मागील पाच ते सहा वर्षापासून दरवर्षी उन्हाळ्यामध्ये गोरेगाव येथे रसवंतीचा व्यवसाय करतात. मार्च महिन्यात रसवंती व्यवसाय सुरू करून जून महिन्यात ते परत गावी जातात.

यावर्षी त्यांनी काही दिवसापूर्वीच गोरेगाव येथील बस स्टँड समोर रसवंती सुरू केली होती. रसवंती जवळच त्यांनी मुक्कामासाठी किरायाने खोली देखील घेतली होती. या ठिकाणी लादूलाल व त्यांचा पुतण्या दोघे राहत होते. नेहमीप्रमाणे मंगळवारी ता. ५ रात्री रसवंती बंद करून लादूलाल व त्यांचा पुतण्या खोलीत झोपण्यासाठी गेले.

दरम्यान पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास एक दुचाकी वाहनावर आलेल्या तिघांनी त्यांच्या खोलीत प्रवेश केला. या ठिकाणी लादूलाल यांच्यावर लोखंडी सराटा व लाकडी दांड्याने वार करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे त्यांचा पुतण्या दचकून जागा झाला त्याने खोली बाहेर येऊन आरडाओरड केली मात्र कोणीही मदतीसाठी आले नाही. तोपर्यंत तिघांनी मारहाण करून लादूलाल यांचा खून केला व घटनास्थळावरून पळ काढला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गोरेगाव पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीदेवी पाटील, उपनिरीक्षक बाबुराव जाधव, जमादार गजानन बेडगे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनास्थळी लोखंडी लाकडी दांडा आढळून आला. पोलिसांनी या घटनेची वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने ही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपींचा माग काढण्यासाठी पथकाला पाचारण करण्यात आले मात्र श्वानपथक जागेवरच घुटमळले. या शिवायय ठसे तज्ञांकडूनही घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. या प्रकरणात अज्ञात आरोपी विरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सीसीटीव्ही फुटेजवरून ओळख पटविण्याचे प्रयत्न

गोरेगावातील बस स्थानक परिसरातील दुकानांसमोर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून मारेकऱ्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केले आहे. त्यासाठी या भागातील सर्वच दुकानांच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...