आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यभर संताप, तरी फडणवीसांचे रेड कार्पेट:कर्मचारी, पेन्शनर्सच्या वेतनासाठी सरकारचा कर्नाटक बँकेशी करार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीमावादात अरेरावी करणाऱ्या कर्नाटक सरकारविरोधात महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात असतानाच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार मात्र या राज्यातील बँकेसाठी पायघड्या घालत आहे. महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते व निवृत्तिवेतन करण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वी १५ बँकांची निवड केली होती. त्यात आणखी ३ बँकांची वाढ केली आहे. यात कर्नाटक, जम्मू व काश्मीर आणि उत्कर्ष स्माॅल फायनान्स बँकेचा समावेश आहे. बुधवारीच देवेंद्र फडणवीस यांच्या वित्त विभागाने हा जीआर काढला आहे.

कर्नाटक बँक ही त्या राज्यातील एक शेड्यूल खासगी बँक असून तिचे मुख्यालय मंगळुरू येथे आहे. आता बँकेतूनही काही कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्तांची पेन्शन दिली जाईल.

मुंबई, औरंगाबाद, नाशकात विविध संघटनांनी कर्नाटक बँकेच्या बोर्डाला काळे फासून बोम्मईंचा निषेध केला.

बातम्या आणखी आहेत...