आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदे- फडणवीस सरकारने ७५ हजार रिक्त जागा भरण्याचा शुभारंभ गुरुवारी दोन हजार नियुक्तपत्रे देऊन केला. त्याच वेळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी निवृत्तीचे वय ५८ वरुन ६० करण्याची मागणी केली आहे. अ आणि ड वर्गातील कर्मचाऱ्यांना ६० वर्षाची अट असताना इतरांना ५८ का, यावर बोट ठेवत सेवा नियमात सुधारणा करण्याची मागणी संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

शासकीय सेवेत १९ लक्ष कर्मचारी आहेत. दरवर्षी ६० हजार कर्मचारी निवृत्त होतात. सामान्य प्रशासनाच्या धोरणानुसार एका वर्षात नवी भरती एकुण पदसंख्येच्या ४% करता येते. त्यामुळे ७५ हजार नवी नोकर भरती करण्यास तब्बल ४ वर्षे लागणार आहेत.

भाप्रसे, भापोसे, सीपीडब्लडी, सीडब्लुसी, तसेच सरकारी सेवेतील डाॅक्टर, न्यायाधीश, चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना निवृत्ती ६० वर्षानंतर आहे. केंद्राने निवृत्तीचे वय ६० केले असून ६२ करण्याची मागणी आहे.यासंदर्भात राजपत्रित अभियंता संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले असल्याची माहिती संघटनेचे सल्लगार सुभाष चांदसुरे यांनी दिली. निवृत्त कर्मचाऱ्यांना ६० लाख रुपये निवृत्तीनिधी द्यावा लागतो. परिणमी, ६० हजार कर्मचाऱ्यांचा सरकारवर वर्षाला ३६०० कोटींचा बोजा येतो. बहुअंशी रिक्त पदे मूळ भरतीची आहेत. निवृत्तीचे वय वाढवल्याने नवीन नोकर भरती लांबेल, हा समज अनाठायी आहे. निवृत्तीचे वय ६० केल्यास शासनाची वर्षाला ४ हजार कोटीची बचत होईल, असा संघटनेचा दावा आहे.

बातम्या आणखी आहेत...