आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:शासकीय कर्मचारी - पेन्शनर्सना महागाई भत्त्याची वाढ व थकबाकी मिळणार रोखीने, सरकारचा जीआर जारी

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारी कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांना ठाकरे सरकारने गोड बातमी दिली आहे. राज्य शासकीय कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक आणि सहाव्या वेतन आयाेगानुसारच्या निवृत्ती वेतनधारकांना १२ वरून १७ टक्के केलेली महागाई भत्त्याची वाढीव रक्कम तसेच ५ टक्के महागाई भत्त्याची थकबाकी आॅक्टोबर २०२१ च्या वेतनासोबत रोखीने द्यावी, असा शासन निर्णय गुरुवारी वित्त विभागाने जारी केला आहे. राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर दिनांक १ जुलै २०१९ पासून १२% वरून १७% असा सुधारित केला आहे.

१ डिसेंबर २०१९ पासून महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या सुधारणेनुसार अनुज्ञेय थकबाकीबाबत स्वतंत्रपणे मिळणार आहे. तसेच राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना १ जुलै २०१९ ते ३० नोव्हेंबर २०१९ या ५ महिन्यांच्या कालावधीतील ५% महागाई भत्ता वाढीच्या थकबाकीची रक्कम ऑक्टोबर २०२१ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे.

कुटुंब निवृत्तिवेतन घेणाऱ्या राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक/ कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना अनुज्ञेय महागाई वाढीचा दर १ जुलै २०१९ पासून १७% करून डिसेंबर २०१९ पासून वाढीची रक्कम रोखीने देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...