आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाणे पोलिसांची वेबसाइट हॅक:सरकारने मुस्लिमांची माफी मागावी, हॅकर्सची मागणी; भाजप प्रवक्त्यांच्या वक्तव्याचे पडसाद

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेबसाईट हॅक केल्यानंतर हॅकर्सनी दिलेला संदेश. - Divya Marathi
वेबसाईट हॅक केल्यानंतर हॅकर्सनी दिलेला संदेश.

भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांनी प्रेषित महंमद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत हॅकर्सनी आज ठाणे पोलिसांची अधिकृत वेबसाइट हॅक केली. इस्लाम आणि पैगंबर यांच्याबद्दल वारंवार आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या जात असल्याने सरकारने जगभरातील मुस्लिमांची माफी मागावी, असा मागणी हॅकर्सनी केली आहे.

शांत बसणार नाही

आज सकाळीच 'one hat cyber team' या नावाने हॅकर्सनी ठाणे पोलिसांची वेबसाइट हॅक केली. 'देशात इस्लामबाबत वादग्रस्त वक्तव्य केले जात आहे. सहिष्णुता काय असते हे सरकारला माहित नाही का? असे वक्तव्य न थांबल्यास आम्ही शांत बसणार नाही', असा इशारा हॅकर्सनी दिला आहे. ठाणे पोलिसांकडून सध्या वेबसाइट सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मलेशियातील हॅकर्सचे आवाहन

भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांतर मलेशियातील हॅकर्स ग्रुप ड्रॅगन फोर्सने जगभरातील मुस्लिम हॅकर्सना भारतावर सायबर हल्ला करण्याचे आवाहन केले आहे. मुस्लिम धर्मियांची माफी मागा, असा संदेश वेबसाइटवर देण्याचे आवाहन या ग्रुपने केले आहे. त्यानुसारच आज ठाणे पोलिसांची वेबसाइट हॅक करण्यात आली आहे.

माहिती सुरक्षित

सध्या समाजांमध्ये दुफळी माजवण्याचे काम वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहे. ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक होणे, हा त्याचाच परिणाम असल्याचे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे. तसेच, या प्रकरणाबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. वेबसाईट हॅक केल्यामुळे कोणताही महत्वाचा तपशील गेलेला नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.

सध्या काही जणांकडून समाजात विद्वेष पसरवला जात आहे. त्यामुळे काही धर्मातील व्यक्तींकडून प्रक्षोभक विधाने करण्यात येत आहेत. हे चुकीचे आहे. अशा प्रक्षोभक आवाहनांमुळे सर्वांचेच नुकसान होणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी अशा गोष्टींपासून दूर राहणे गरजेचे आहे, असे वळसे पाटील म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...