आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:सरकारकडून हिंदूंमध्ये दहशत निर्माण कारण्याचा प्रयत्न : नितेश राणे

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी रविवारी मुंबईतील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना, ‘हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे काम ठाकरे सरकार करत आहे,’ असा आरोप राणे यांनी केला.

राणे म्हणाले, मेट्रोच्या कार्यक्रमात सरकारला गर्दी दिसत नाही. काल बेस्टचा कार्यक्रम झाला, तिथे स्वतः मुख्यमंत्री होते. तिथे यांना गर्दी दिसली नाही. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी कार्यालयाचे उद्घाटन झाले. तिथे यांना गर्दी दिसली नाही. सणांच्या निमित्त जे होर्डिंग्ज लागतात, ज्यावर या सगळ्या गणेशोत्सवांतील आर्थिक गणिते असतात, आता त्या होर्डिंग्जवरदेखील सरकारने बंदी घातलेली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...