आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लव्ह जिहाद विधेयकापूर्वी 10 सदस्यीय समिती:आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या मुलींशी राज्य सरकार संवाद साधणार

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसई (जि. पालघर) येथील श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे राज्यात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. आगामी नागपूर अधिवेशनात हे विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. मात्र विधेयक आणण्यापूर्वीच आंतरधर्मीय लग्न करणाऱ्या मुलींच्या सुरक्षेसाठी मोठे पाऊल सरकारने उचलले आहे. आगामी सात दिवसांत १० सदस्य समिती या प्रकरणासाठी स्थापन केली जाईल, अशी माहिती महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शनिवारी (ता.१०) दिली.

श्रद्धा वालकर प्रकरणात जे काही घडले ते सर्वांनी पाहिले आहे. मुले-मुली कुटुंबावर नाराज होऊन आंतरधर्मीय विवाह करतात. मूळ कुटुंबापासून विभक्त होतात. त्यात लग्न होते. त्यांनाही माहिती असते त्या मुलीला कोणी विचारणार नाही. त्यांच्या मागे कोणी उभे नाही. त्यामुळे वालकर प्रकरण घडले आहे. असा प्रकार भविष्यात होऊ नये यासाठी कुटुंबांच्या इच्छेविरोधात जाणाऱ्या मुला-मुलींशी सरकार संवाद ठेवणार आहे. गरज पडल्यास त्यांना मदत करण्याची भूमिका राज्य सरकारची असेल, असे लोढा यांनी सांगितले.

कुटुंबापासून दुरावलेल्या मुलींच्या समस्या सोडवणार प्रेमविवाह केलेल्या मुलींच्या आयुष्यात सध्या काय सुरू आहे याबाबत ही समिती माहिती घेईल. ही समिती आंतरधर्मीय प्रेमप्रकरणामुळे ज्या मुली कुटुंबापासून दूर गेलेल्या आहेत त्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे. या मुलींशी समन्वय साधून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार काम करणार आहे, असेही लोढा म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...