आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'वर्षा'वरील बैठक संपली:सरकार पडणार नाही, काळजी करू नका, एकनाथ शिंदे परत येतील- उद्धव ठाकरेंचे आमदारांना आवाहन

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी सुरू असलेली बैठक संपली. या बैठकीत उर्वरित शिवसेना आमदारांना लोअर परळ येथील रिसॉर्टमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकनाथ शिंदे लवकरच आपल्या स्वगृही परततील अशी आशाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह सुरत गाठल्यानंतर महाविकास आघाडीला मोठा झटका बसला. यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी वर्षा या निवासस्थानी बैठक बोलावली होती. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती. याशिवाय आज काँग्रेसचीही बैठक झाली.

भाजपसोबत असताना कमी त्रास झाला का?

एकनाथ शिंदे आता भाजपशी हातमिळवणी करणार असल्याची चर्चा आहे. तुम्ही भाजपसोबत असताना तुम्हाला कमी त्रास झाला होता का? त्यामुळे आता भाजपसोबत कसे जायचे? असा सवाल मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला. एकनाथ शिंदे माझे ऐकतील याची मला खात्री आहे. लवकरच सर्व आमदार तुमच्यासोबत असतील. राष्ट्रवादी-काँग्रेस आमच्यासोबत आहे असेही ठाकरे म्हणाले.

आपण बाळासाहेबांचे सैनिक

आज झालेल्या बैठकीत शिवसेनेचे केवळ अठराच आमदार होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना उद्देशून सांगितले की, आपण बाळासाहेबांचे निष्ठावान शिवसैनिक आहोत. शिवसेनेवर आलेल्या संकटाने खचून जाऊ नका. सरकार पडणार नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपल्यासोबत आहे. नाराज आमदारांची समजूत काढली जात आहे असेही ते म्हणाले.

शिवसेना आमदार सुरक्षितस्थळी

वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांना मार्गदर्शन केले, या बैठकीनंतर शिवसेना आमदारांना वर्षा बंगल्यातून वरळीतील सेंट रेगिस हॉटेलमध्ये हलवण्यात आले आहे. सध्या शिवसेनेचे केवळ अठराच आमदार असल्याची चर्चा आहे.

काँग्रेसची बैठक

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी काँग्रेस आमदारांची बैठक झाली. प्रदेश प्रभारी एच के. पाटील, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. ठाकरेंनी आम्हाला सर्व परिस्थितीची माहिती दिली आहे असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.