आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषद आमदार:राज्यपाल नियुक्त आमदार, निवड लांबणीवर पडणार; कोरोना पार्श्वभूमीवर पुन्हा राज्यपाल-सरकार यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची निवड लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. ३ आॅगस्टपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आहे. अधिवेशन लांब असल्याने राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या शिफारशी इतक्यात केल्या जाणार नाहीत. शिफारशींवर अधिवेशनापूर्वी निर्णय घेणे राज्यपालांना बंधनकारक असते. कोरोना पार्श्वभूमीवर पुन्हा राज्यपाल-सरकार यांच्यात संघर्ष होऊ शकतो त्यामुळे निवड टाळली जाईल, असे राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी भेट घेतली. या वेळी पक्षाचे नेते जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...