आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांतता धोरणाची राज्यपालांकडून खिल्ली:नेहरू स्वत:ला शांततादूत समजायचे, तेच महागात पडले : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू स्वत:ला शांततादूत समजायचे. त्यांची हीच भूमिका अनेक वर्षांपर्यंत देशाला महागात पडली, असे वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमवारी केले. राजभवनात कारगिल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी देश आणि स्वातंत्र्यलढ्यात नेहरूंचे योगदान मोठे होते, असेही गौरवोद्गार काढले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी कोश्यारींच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. ते म्हणाले, “शांततेला चालना देणे म्हणजे कमकुवत असणे नाही. असे असेल तर बसने लाहोरला जाणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींबाबत कोश्यारींचे काय मत आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी तत्कालीन पाकिस्तानी पीएम नवाझ शरीफांच्या वाढदिवशी पाकिस्तानला गेले होते. या घटना दुर्बलता दाखवतात का?’ असा सवालही चव्हाण यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...