आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे राज्यपालांवर टीकास्त्र:कोश्यारींच्या बोलण्यात हुशारी नाही; दोघांच्या आदेशाचे पालन करतात म्हणून पदावर - जयराम रमेश

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे खासदार तथा राष्ट्रीय सचिव जयराम रमेश यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. जयराम रमेश म्हणाले की, नाव कोश्यारी असले तरी त्यांच्या बोलण्यात मात्र हुशारी दिसून येत नाही अशी खोचक टीका केली आहे. भाजपमधील दोघांच्या आदेशाचे पालन करतात म्हणून त्यांना या खुर्चीवर बसवले आहे असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

राजकीय परंपरेचा स्तर खालावला - सावंत

राज्याचे राज्यपाल त्यांच राज्यातील जनतेचा अपमान करतात हे भयानक आहे, असे म्हणतांना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की, गुजराती, राजस्थानी विषय राहु द्या सर्वांत आधी यांना नारळ द्यायला हवा. कोश्यारी यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला असून महाराष्ट्राचा अवमान झाला आहे असे सावंत यांनी म्हटले आहे.

राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसह शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली. मात्र, भाजपकडून कुणीही यावर अधिकृत भूमिका व्यक्त केली नसली तरी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनी राज्यपालांची पाठराखण केली. यामुळे आता भाजपविरुद्ध इतर पक्ष असा वाद पेटतो की काय अशी चिन्ह दिसू लागली आहे.

बातम्या आणखी आहेत...