आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:राज्य भाजपतील फूट टाळण्यासाठी राज्यपाल कोश्यारींनी भेट नाकारली, रखडलेल्या नियुक्त्यांवर नाना पटोले यांचा दावा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषदेवरील रखडलेल्या १२ सदस्यांच्या नियुक्त्या मार्गी लागल्यास राज्य भाजपत मोठी फूट पडणार आहे. ती टाळण्यासाठी या नियुक्त्या रखडवून ठेवण्यात आल्या आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना गुरुवारी (दि.२६) भेटीची वेळ दिली नाही, असा खळबळनक दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

टिळक भवन येथे गुरुवारी विधानसभा व लोकसभा २०१९ च्या निवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या पराभूत उमेदवारांची बैठक झाली. यानंतर पटाेले यांनी राज्यपाल यांच्या भेटीसंदर्भात विधान केले. विधानपरिषदेवर राज्यपाल नामनियुक्त पाठवायच्या १२ सदस्यांच्या नियुक्तीचा विषय गेल्या आठ महिन्यापासून प्रलंबित आहे. अगदी न्यायालयापर्यंत हा विषय गेला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूलमंत्री हे गुरुवारी भेटणार होते. संध्याकाळी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही भेट होणार होती, असे पटोले म्हणाले. मुख्यमंत्र्यांना भेटीची वेळ देण्यात यावी,असा निरोप मुख्यमंत्री कार्यालयाने पाठवला होता. त्यावर राजभवनने कळवतो असे सांगितले, पण कळवण्यात आले नाही. आता मुख्यमंत्री कार्यालयातूनच मिलिंद नार्वेकर यांना वेळ घेण्यासाठी पाठवल्याचे पटोले यांनी या वेळी बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...