आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Governor Koshyari Avoids Appearing On The Same Platform With Chief Minister Uddhav Thackeray, Absent From Police Memorial Day 2020 Program

राज्यपालांची नाराजी:मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणे राज्यपाल कोश्यारींनी टाळले, पोलिस स्मृती दिन 2020 कार्यक्रमाला अनुपस्थिती

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईमध्ये आज सकाळी 07.00 वाजता हुतात्मा मैदान, नायगाव पोलीस मुख्यालयात 'पोलिस स्मृती दिन' मानवंदना कवायतीचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील धार्मिक स्थळे ही बंद आहेत. ही खुली करण्यावरुन राजकारण तापले होते. यावरुन राज्यपाल भगतसिंग आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये वाद रंगला होता. आता यावरुनच राज्यपालांची नाराजी असल्याचे दिसत आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांसोबत एकाच व्यासपीठावर हजर राहणे टाळले आहे. पोलिस स्मृती दिन 2020 च्या कार्यक्रमाला ते गैरहजर राहिले.

मुंबईतील असलेल्या पोलिस स्मृती दिन 2020 कार्यक्रमाला राज्यपाल गैरहजर राहिले आहे. मुंबईमध्ये आज सकाळी 07.00 वाजता हुतात्मा मैदान, नायगाव पोलीस मुख्यालयात 'पोलिस स्मृती दिन' मानवंदना कवायतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक हजर होते.

मंदिरे उघडण्याच्या मुद्यावरून राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये पत्र व्यवहार झाला होता. यानंतर दोघांमध्ये प्रचंड वाद झाला. यानंतर राज्यपाला नाराज असल्याचे दिसत आहे. कारण राजशिष्टचारानुसार राज्यपालांनी या कार्यक्रमाला हजर राहणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. यामुळे ते मुख्यमंत्र्यांवर अजुनही नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

काय होता वाद?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत हिंदुत्वावावरुन डिवचले होते. आता यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही उत्तर दिले. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही असे म्हणत त्यांनी खोचक शब्दांमध्ये त्यांना प्रत्युत्तर दिले होते.

पत्रात काय म्हणाले होते राज्यपाल?
हिंदुत्वाचे आपण खंदे पुरस्कर्ते आहात. धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय पुढे ढकलण्यासाठी आपल्याला कोणतीही दैवी सूचना मिळतेय की तुम्ही ज्या शब्दाचा तिरस्कार करत होता, ती ‘धर्मनिरपेक्षता’ तुम्ही अंगिकारली? आहे' असा उपरोधिक सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी विचारला होता.

यावर कडाडले उद्धव ठाकरे
'माझ्या हिंदुत्वाचा आपण जो उल्लेख केला, तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे ठाकरे म्हणाले. पुढे ते म्हणाले की, तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही असे म्हणत त्यांनी राज्यपालांना सुनावले होते.

हिंदुत्वाविषयी बोलताना ठाकरे म्हणाले की, माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही. तसेच हिंदुत्वाविषयी तुम्हाला असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि नउघडणे म्हणजे Secular असे आपणास वाटते का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का? असा उलट सवालही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला होता.

बातम्या आणखी आहेत...