आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपयांची भाऊबीज, महिला व बालविकास विभागाकडून जीआर जारी

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजना या केंद्रपुरस्कृत योजनेअंतर्गत असलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना सरकारने दोन हजार रुपयांची भाऊबीज भेट देण्याचा निर्णय गुरुवारी घेतला आहे. सरकारच्या निर्णयाचा २ लाख ७ हजार अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना लाभ होणार आहे.

महिला व बालविकास विभागाने आज यासाठीचा शासन निर्णय जारी करून अंगणवाडी सेविकांना २ हजार रुपयांप्रमाणे भेट देण्यासाठी निर्णय जाहीर केला आहे. यासाठी सरकारकडून ३८ कोटी ६० लाख ८४ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात २ लाख ७ हजार अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या कार्यरत आहेत. कोरोनाच्या काळात मागील सात महिन्यांपासून त्यांच्यावर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी राज्य सरकारकडून सोपवण्यात आली यादरम्यान, दिवाळीची भाऊबीज भेट सरकारकडून लवकरच जाहीर केली जावी, अशी मागणी विविध संघटनांकडून करण्यात आली होती त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय जाहीर केला आहे. सरकारने भाऊबीजपेक्षा अंगणवाडी सेविकांच्या दैनंदिन भत्त्यात वाढ करायला हवी होती, अशी अपेक्षा अंगणवाडी संघटनांनी केली आहे.

भत्त्याची अडचण
राज्यातील अंगणवाडी सेविकांना कोविड आणि त्याच्या संदर्भातील विविध प्रकारची कामे सोपवण्यात आली आहेत. शहरी भागापासून ते ग्रामीण भागांपर्यंत या अंगणवाडी सेविका त्यासाठी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांना यासाठी कोविडचा रिस्क भत्ता म्हणून सरकारकडून एक हजार रुपये जाहीर करण्यात आले होते. परंतु मागील काही महिन्यांत तेही त्यांच्या हातात मिळत नसल्याने त्याविषयीची खंत अंगणवाडी सेविका कर्मचारी संघटनेच्या शुभा शमीम यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...