आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यामधील विधान परिषदेच्या 5 जागांसाठी येत्या 1 डिसेंबर रोजी निवडणूक घेतली जाणार आहे. यावेळी पहिल्यांदाच महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात थेट सामना रंगणार आहे. पुणे शिक्षक मतदारसंघ, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक, औरंगाबाद पदवीधर अशा 5 जागांसाठी हे मतदान घेतले जाणार आहे. तर तीन डिसेंबरला मतमोजणी होईल. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे.
अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस असल्यामुळे भाजप, महाविकास आघाडी , मनसे , वंचित आणि बंडखोरांचीही तयारी सुरू आहे. आज अनेक उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात येतील. यावेळी त्या-त्या पक्षाचे मोठे नेते उपस्थित राहतील. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. राज्यातील राजकारणामध्ये या मोठ्या हालचाली आज घडणार आहेत.
1 डिसेंबरला होणार मतदान
राज्यातील 5 पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये 3 जागा पदवीधर मतदारसंघ तर 2 जागा शिक्षक मतदारसंघासाठी आहेत. या पाच जागांसाठी 1 डिसेंबरला मतदान होईल तर 3 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. दरम्यान आज अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. 13 नोव्हेंबरला आलेल्या अर्जांची छानणी होणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख 17 नोव्हेंबर आहे.
दरम्यान महाविकास आघाडी या निवडणुकींच्या रिंगणात पहिल्यांदाच एकत्र निवडणूक लढवणार आहे. यामध्ये नागपूर पदवीधर शिवसेना लढवणार आहे. पुणे शिक्षक मतदारसंघ ही निवडणूक काँग्रेस लढणार आहे तर औरंगाबाद आणि पुणे पदवीधर निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे.उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राष्ट्रवादी पुणे पदवीधर मतदारसंघात कोणाला उमेदवारी देणार याबाबत उत्सुकता होती, अखेर शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने अरूण लाड यांना पुणे पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवारी दिली आहे. मात्र यापूर्वी पुणे पदवीधर मतदारसंघातून कोल्हापूरमधून राष्ट्रवादीचे भैय्या माने यांनी 11 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल होता. आता हे अर्ज मागे घेणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.