आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यभरातील ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना अर्ज पारंपरिक (ऑफलाइन) पद्धतीने भरता येणार आहेत. तसेच, अर्ज सादर करण्याची मुदत २ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी गुरुवारी दिली.
राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली होती. २८ नोव्हेंबर २०२२ ते २ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील असे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या अनेक उमेदवारांचे ऑनलाइन पद्धतीने एकाच वेळी अर्ज भरले जात आहेत. त्यामुळे संकेतस्थळ मंद झाले होते. परिणामी, अनेक उमेदवारांना अर्ज सादर करण्यात बुधवारी अडथळे आले. यावर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य निवडणुक आयोगाचे अध्यक्ष यांना निवेदन दिले. त्यानंतर काही तासात आयोगाने पारंपरिक पद्धतीने अर्ज सादर करण्यास संमती दिली. राज्य निवडणूक आयोगाने या मागणीचा विचार करून हा निर्णय घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.