आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 74 टक्के मतदान:कुणाला मिळणार किती जागा? कोण ठरणार वरचढ मंगळवारी निकाल

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 74 टक्के मतदान झाले. यावेळी सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले. आता मंगळवारी मतमोजणी असुन कुणाला किती जागा मिळतील हे कळणार आहे.

7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी मतदान

राज्य निवडणूक आयोगाने 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या, तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे आज प्रत्यक्षात 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान झाले.

दुपारी 3.30 पर्यंत 67 टक्के मतदान

दुपारी 3.30 पर्यंत प्राथमिक माहितीनुसार सरासरी 67 टक्के मतदान झाले होते. नक्षलग्रस्तभागात दुपारी 3.30 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. सर्व ठिकाणी 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल.

प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या:

  • ठाणे - 35, पालघर - 62, रायगड - 191, रत्नागिरी - 163, सिंधुदुर्ग - 291, नाशिक - 188, धुळे - 118, जळगाव - 122, अहमदनगर - 195, नंदुरबार - 117, पुणे - 176
  • सोलापूर - 169, सातारा - 259, सांगली - 416, कोल्हापूर - 429, औरंगाबाद - 208
  • बीड - 671, नांदेड - 160, उस्मानाबाद- 165, परभणी - 119, जालना - 254, लातूर - 338,
  • हिंगोली - 61, अमरावती - 252, अकोला - 265, यवतमाळ - 93, बुलडाणा - 261
  • वाशीम - 280, नागपूर - 234, वर्धा - 111, चंद्रपूर - 58, भंडारा - 304, गोंदिया - 345, गडचिरोली- 25.
  • एकूण - 7,135.

नंदुरबार जिल्ह्यातील अपडेट्स

नंदुरबार जिल्ह्यातील 123 ग्रामपंचायतींची आज मतदान प्रक्रिया पार पडली 412 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया घेण्यात आली. सातपुडा दुर्गम भागातील धडगाव अक्कलकुवा तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींची मतदान करण्याची वेळ साडेतीन वाजेपर्यंत होती. इतर तालुक्यांमध्ये सकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ असतानाही संध्याकाळी उशिरापर्यंत नवापूर तालुक्यातील विसरवाडी ग्रामपंचायत मध्ये सहा वाजेपर्यंत मतदान सुरू होते.

नवापूर तालुक्यातील खडकी ग्रुप ग्रामपंचायत मध्ये पिंपळे मतदान केंद्रावर उशिरा 7 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. पिंपळे मतदान केंद्रावर 1092 मतदारांपैकी 966 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा साडेसात वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया राबविली. मतदारांची संख्या जास्त असल्याने या केंद्रावर दोन बूथ निर्माण करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

अक्कलकुवा धडगाव नंदुरबार शहादा तळोदा आणि नवापूर तालुक्यांमध्ये साडेतीन वाजेपर्यंत जवळपास 57.36 टक्के मतदान पूर्ण झाले होते. तिसऱ्या टप्प्यातील 123 ग्रामपंचायत मतदानाची आकडेवारी 70 टक्केपर्यंत जाण्याची शक्यता आहे. दोन ते तीन मतदान केंद्रांवरील अपवाद वगळता मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली आहे. 20 डिसेंबर रोजी तहसील कार्यालयांमध्ये निकाल जाहीर होणार असून मतदार व उमेदवारांमध्ये गावाचा कारभारी कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.​​

सातारा जिल्हा अपडेट

सातारा जिल्ह्यात 82 टक्के मतदान झाले

(कंसाबाहेरील आकडे एकूण निवडणूक असलेल्या ग्रामपंचायती व कंसातील आकडेवारी टक्केवारी आहे.​​​​​​)

सातारा 29 (80), जावळी 11(79), कोरेगाव 43 (85) वाई 7(79.88), खंडाळा 2 (75.46), महाबळेश्वर 3(82), कराड 33 (83.14), पाटण 71(78.68), फलटण 20 (82.43), माण 28 (80), खटाव 12 (79).

बातम्या आणखी आहेत...