आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेत 'इनकमिंग' सुरु:औरंगाबादेतील 50 गावातील ग्रामपंचायत सदस्य, सरपंच शिवसेनेत; अनेकांनी हाती बांधले शिवबंधन

औरंगाबाद3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सत्तासंघर्षानंतर शिवसेनेचे डॅमेज कंट्रोल भरून काढण्यासाठी आता शिवसेनेने इनकमिंग सुरु केली आहे. अनेकांचे पक्षप्रवेश होत असतानाच औरंगाबादेतही नेते कामाला लागले आहेत. औरंगाबादेतील वैजापूरच्या 50 गावातील ग्रामपंचायत सदस्य व सरपंच हे येत्या काही दिवसांत शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत. त्यांनी आज प्रातिनिधिक स्वरुपात शिवबंधन हाती बांधले.

या पार्श्वभूमीवर आज माजी राष्ट्रवादी कार्याध्यक्ष विजयराव साळवे , संघर्ष सोनवणे, विक्की चावरीया व कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवन येथे शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

आज शिवसेनेत पक्षप्रवेश घेतलेल्या संभाजीनगर पश्चिम व वैजापूर मधील सर्वांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले. निवडणुका केव्हाही जाहीर होतील. पुढच्या निवडणुकीत शिवरायांचा भगवा फडकावयाचा आहे, त्यामुळे शिवसेना बळकटीकरणासाठी कामाला लागा असे मार्गदर्शन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवीन कार्यकर्त्यांना केले.

वैजापूरमधील जितेंद्र पाटील जगदाळे,सरपंच जानेफळ, विविध सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष कैलास सुरेश जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य विश्वालफ कुहिले, जानेफळ गावचे तंटा मुक्ती अध्यक्ष जगन पाटील जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य करजगाव तान्हाजी पाटील उगले, सरपंच पेडेफळ, सोपान पाटील आहेर, सुनील पाटील मतसगर जानेफळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवन येथे शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

बातम्या आणखी आहेत...