आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले अाहे, पण प्रत्येक खात्याला मंत्री नसणे, हे दुर्दैव आहे. भाजपच्याच एका नेत्याने मला सांगितले की, हे सरकार एक दुजे के लिये सरकार आहे. महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय? अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.
त्या म्हणाल्या की, ‘मविआतील तीन नेत्यांवर कारवाया झाल्या आहेत. या तिन्ही केसेसनंतर त्यांच्या कुटुंबीयातील लेकी सार्थ लढत आहेत. याचा मला अभिमान वाटतो. जे खरे आहे, ते नक्कीच बाहेर येईल. देशमुख परिवार असो वा राऊत, त्यांचे कुटुंबीय भक्कमपणे मागे आहेत. शरद पवार आणि संजय राऊत यांचे संबंध चांगले आहेत. पवारांची मैत्री उभ्या महाराष्ट्राने पाहिली आहे. सत्ताधाऱ्यांना टीका करण्याशिवाय काही येत नाही.’
आदित्य यांच्या दौऱ्यांना राज्यात यश मिळतेय
सुळे म्हणाल्या, ‘आदित्य ठाकरे खूप मेहनत घेत आहेत, जो लढतो त्यांना लोक प्रतिसाद देतात. एकनाथ शिंदेंनी धमकी दिली या बाबींची आता सवय लागली आहे. जो राज्याला न्याय देईल, गरिबांना साथ देतील त्यांना लोक यश देतात. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यांना चांगला प्रतिसाद व यश मिळत आहे.’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.