आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

इंटरव्ह्यू:खेळ सुरू करण्यात माेठा धोका; रॅकेट वैयक्तिक असतात, मात्र शटल सर्वजण वापरतात : श्रीकांत

चंदिगड | गौरव मारवाह3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्रीकांतच्या नावाची सर्वाेच्च खेलरत्नसाठी शिफारस

कोविड- कोविड-१९ मुळे देशात अद्याप खेळ सुरू झालेले नाहीत. खेळाडू फिटनेसपर्यंत मर्यादित आहेत. खेळ सुरू करण्याबाबत सर्वांच्या मनात भीती आहे. देशातील अव्वल बॅडमिंटनपटू आणि रेडबुलचा खेळाडू किदांबी श्रीकांत देखील त्यातील एक आहे. तो म्हणतो की, खेळ सुरू करण्यात धोका तर आहेच, कारण बॅडमिंटन रॅकेट सर्वांचे वैयक्तिक असतात, मात्र शटल सर्वांना वापरावे लागतात. श्रीकांतला यंदा देशातील सर्वात मोठ्या खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकित केले आहे. त्याच्या चर्चेतील काही भाग खास वाचकांसाठी.

सरावाबाबत भीती आहे, एकत्र साहित्य वापरणे धोकादायक?
उत्तर :
हो, माझे बूट व माझ्या रॅकेटचा केवळ मीच वापर करतो. मात्र, शटल व कोर्टचा प्रत्येक जण वापर करतो. शटलचा वापर तर विरोधी खेळाडूही करतो. त्यात थोडा धोकादेखील आहे.

स्वत:ला तयार करण्यासाठी काय करतोय, किती तास सराव?
उत्तर :
सध्याचा काळ असा आहे, जो आजपर्यंत कधी अनुभवला नव्हता. मी त्यासाठी प्रत्येक दिवशी स्वत:ला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. दररोज एक-दीड तास सराव करतोय. हा हलका सराव आहे. माझ्या घरी संपूर्ण सुविधा नाही, काही घरच्या घरी सराव व व्यायाम करतोय. मी फिटनेस शिवाय इतर वेगळे केले नाही.

प्रीमियर लीगमुळे भारतीय बँडमिंटनमध्ये किती बदल झाला?
उत्तर :
प्रीमियर बॅडमिंटन लीगने (पीबीएल) युवा खेळाडूंना वरिष्ठ खेळाडूंसोबत खेळण्याची संधी दिली. हे ते ठिकाण आहे, जेथे आपण मनमोकळे खेळू शकतो. तुमच्यावर कोणताही दबाव असणार नाही. ते आपल्याला त्या प्रेक्षकांसमोर खेळण्याची संधी देत आहे, जे आपल्यावर प्रेम करतात. अनेक युवा खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळाले.

तुझे भविष्यातील नियोजन काय आहे, कारण गेल्या अनेक महिन्यांपासून खेळाडूंनी सराव केलेला नाही?
उत्तर :
गेल्या तीन महिन्यांपासून कोणतेही बॅडमिंटन झाले नाही. मला माहिती नाही, केव्हा सुरू होईल. भारतात परिस्थिती खूप खराब आहे. परिस्थितीमध्ये सुधारणा झाल्यावरच आपण सराव व स्पर्धा सुरू करण्याबाबत विचार करू शकतो. मला विश्वास नाही, आता स्पर्धा सुरू होऊ शकतील. त्यासाठी फिट राहा, सुरक्षित रहा. हीच प्राथमिकता आहे.

यंदा तुझे नाव खेलरत्नसाठी पाठवण्यात आले आहे, कसे वाटत आहे?
उत्तर :
खेलरत्नसाठी नामांकित केल्याचा मला माेठा अभिमान वाटत आहे. ही माझ्यासाठी महत्वाची बातमी आहे. यातूनच माझा आत्मविश्वास आता दुणावला आहे. हा देशातील खेळाडूसाठी मोठ्या सन्मानापैकी एक आहे. हा पुरस्कार मिळवणे स्वप्नासारखे असेल आणि खरच वाटते, हा पुरस्कार मला मिळावा. यातून मला करिअरमध्ये यशाचा माेठा पल्लाही गाठायचा आहे.