आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आवाहन:महापरिनिर्वाणदिनी असाल तेथून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करा : धनंजय मुंडे

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमी सोहळ्याचे करणार थेट प्रक्षेपण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या महापरिनिर्वाणदिनी भीमानुयायांनी दादर येथील चैत्यभूमीवर प्रत्यक्ष येऊ नये. चैत्यभूमीवरील ६ डिसेंबर रोजीच्या सोहळ्याचे सोशल मीडियावर थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून असाल तेथून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करा, असे आवाहन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. तसेच सन २०२३ पर्यंत इंदू मिलमधील बाबासाहेबांचे स्मारक पूर्ण होईल, अशी ग्वाही मुंडे यांनी दिली. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे सुरू असलेल्या कामांचा बुधवारी मुंडे यांनी प्रत्यक्ष जाऊन आढावा घेतला. त्यानंतर ते बोलत होते. ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथील सोहळ्याचे प्रक्षेपण केले जाणार आहे. त्यासाठी अयोध्या येथील राम मंदिराच्या पायाभरणी समारंभासाठी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे, असे मुंडे म्हणाले.

तळमजल्याचे काम पूर्ण; २०२३ पर्यंत स्मारक पूर्ण करणार

डॉ. आंबेडकर यांचे स्मारक मार्च २०२३ मध्येच पूर्ण करून स्मारकाचा लोकार्पण सोहळा १४ एप्रिल २०२३ रोजी केला जाईल. स्मारकाच्या तळमजल्याचे काम पूर्ण झाले असून मुख्य प्रवेशद्वार साडेसहा फूट उंच करण्यात आले आहे. स्मारकाची सर्व कामेही वेगात सुरू आहेत. स्मारक समितीच्या अधिकाऱ्यांसोबत मुंडे यांनी चर्चा केली.

बातम्या आणखी आहेत...