आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववर्षाचा उत्साह:राज्यभरात गुढीपाडव्या निमित्त शोभा यात्रा, निर्बंधमुक्त झाल्याने सण उत्साहात साजरा

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुढीपाडवा या सणाला फार महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या सणाच्या दिवशी सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. गेली 2 वर्ष कोरोनामुळे गुढीपाडवा साजरा करता आला नव्हता. मात्र यंदा गुढीपाडवा निर्बंधमुक्त झाल्याने राज्यभरात घरोघरी गुढी उभारण्यात आली. तसेच अनेक शहरात शोभायात्रा काढण्यात आल्या, यावेळी तरुण पारंपारिक वेशात मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल ताशाच्या गजरात शोभा यात्रा काढण्यात आल्या. याची काही खास क्षणचित्रे दिव्य मराठीच्या माध्यमातून पाहूयात...

राज्याभरात शोभायात्रा आणि गुढी उभारत नववर्षाचे स्वागत करण्यात येत आहे. बाजारपेढेत खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येत आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्यभरात विविध ठिकाणी शोभायात्रा निघतात. तसेच मुंबई, पुणे, नागपूर आदी शहरांमध्ये शोभायात्रा काढल्या जात आहेत यासंबंधीचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यामध्ये लोक ढोल वाजवून नवीन वर्षाचे स्वागत करत आहेत. यातील पुण्याच्या कोथरूडमध्ये महिलांनी मोठ्या उत्साहात सण साजरा केला.

मुंबईच्या गिरगाव परिसरात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी पारंपारिक पोशाख परिधान करत या बाईक रॅलीत सहभाग घेतला होता. तर नागपूरच्या खामला चौकातून देखील शोभायात्रा काढण्यात आली होती, यात अनेकांनी पारंपारिक पोशाख परिधान केले होते. गुढी पाडव्या निमित्त राज्यातील विविध भागात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...