आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलिकांची प्रतिक्रिया:गुजरात एटीएसची कारवाई, 600 कोटींचे हेरॉईन जप्त; ‘उडता गुजरात’ म्हणत नवाब मलिकांचे ट्विट

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातमध्ये एटीएसचीने मोठी कारवाई केली आहे. मोरबी जिल्ह्यातील जांजुरा या गावामधून तब्बल 120 किलोल हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. याची किंमत अंदाजे सहाशे कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी गुजरात एटीएसने दोन जणांना अटक केली आहे.

राज्याचे मंत्री हर्ष सांगवी यांनी याबाबत माहिती दिली आहे. नुकतेच मागील आठवड्यात गुजरातमध्ये साडेतीनशे कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडण्यात आले होते. त्यापूर्वी महिनाभर आधी तब्बल नऊ हजार रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले होते. त्यावर आता राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नवाब मलिक यांनी ट्विट करत लिहले आहे की, 'आता पुन्हा गुजरात कनेक्शन, उडता गुजरात' असे ट्विट करत मलिकांनी ड्रग्जचे गुजरात कनेक्शन असल्याचे म्हटले आहे. आठवड्याभरात तब्बल दोनदा गुजरातमध्ये ड्रग्जचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे आता राजकीय मंडळी या प्रकरणी टीका टिप्पणी करताना पाहायला मिळत आहे.

खंभालिया परिसरात तब्बल साडे तीनशे कोटींचे ड्रग्ज सापडले

गुजरातमधील द्वारकाच्या खंभालिया परिसरात 11 नोव्हेंबरला तब्बल साडे तीनशे कोटींचे ड्रग्ज सापडले होते. त्यात हेरॉईनसह एमडीचा समावेश होता. धक्कादायक म्हणजे या ड्रग्जची तस्करी पाकिस्तानातून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

गुजरात पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. सज्जाद घोसी, सलीम कारा आणि अलीभाई असे या तीन तस्करांचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ड्रग्ज पाकिस्तानमधून समुद्राच्या मार्गे येत होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड मारत ड्रग्ज जप्त केले होते. स्थानिक गुन्हे शाखेला एक व्यक्ती ड्रग्जची तस्करी करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत या आरोपीकडून दोन बॅग जप्त केल्या. यामध्ये एका बॅगमध्ये 15 किलो तर दुसऱ्या बॅगमध्ये 45 किलो ड्रग्ज आढळून आले.

9 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त
महिन्याभरापूर्वी गुजरातमध्ये आदानी समूहाकडे मालकी असलेल्या कच्छ भागातील मुंद्रा पोर्टवरून तीन हजार किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. त्याची किंमत अंदाजे नऊ हजार कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे अफगाणिस्तानमधून या ड्रग्जची तस्करी करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन करण्यात येत आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून ड्रग्जची तस्करी होत असल्याचे समजते. पोलिसांकडून सापळा रचून कारवाई केली जात आहे. मुंबईनंतर गुजरातमध्ये ड्रग्जची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गुजरात एटीएसची पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...