आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:प्रकल्प पळवण्यासाठीच गुजरात निवडणुका उशिरा जाहीर :  शिवसेनेचे नेते अरविंद सावंत

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आज गुजरातेत निवडणुका लागल्या. आता महाराष्ट्रातही विधानसभेच्या निवडणुका लागतील. ​​​​​​हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुका एकाच तारखेला घ्यायला हव्या होत्या. परंतु गुजरातची तारीख नंतर घोषित केली. या काळात महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातेत पळवायचे होते म्हणून त्यांनी गुजरातेतील तारीख उशिरा घोषित केली, असा आरोप शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. सावंत म्हणाले, कालपर्यंत महाराष्ट्राचा विकास करणारे सर्व प्रकल्प गुजरातला पळवले, महाराष्ट्राचा रोजगार हिरावला. महाराष्ट्राच्या निवडणुकाही लवकरच घोषित करण्याचा हा एक प्रयत्न केंद्राकडून होणार आहे. केंद्र सरकार सर्व गोष्टी करीत आहे. बुलेट ट्रेनची जागा जवळजवळ मोफत घेतली आणि आम्हाला धारावीच्या प्रकल्पासाठी कांजूरची जागा विकत घ्यावी लागते. राज्यातील प्रकल्पांचे मविआकडून पैसे घेतले. हे जे चालले त्याचा महाराष्ट्रात संताप आहे.

युतीचे स्वागत करू : शिवशक्ती-भीमशक्तीचा यापूर्वी प्रयोग झाला. प्रकाश आंबेडकरांना शिवसेनेचे हिंदुत्व मान्य आहे हे ते आधीच म्हणाले आहेत. आम्ही अजून जवळ आलो नाही, पण विचारधारा जर एकत्र येत असेल,तर या युतीचे स्वागत आहे, असेही शिवसेना नेते अरविंद सावंत म्हणाले.

मुख्यमंत्री प्रसिद्धीसाठी शेतात : मुख्यमंत्री पत्रकारांना हेलिकाॅफ्टरने घेऊन गावी गेले. गाड्यात फिरले. पण आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे काळीज फाटले आहे, पण सीएम हेलिकाॅफ्टरने फिरताय. त्यांनी शेतकऱ्यांना मदत करणे तर सोडाच, पण मुख्यमंत्री शिंदे प्रसिद्धीसाठी स्टंट करत आहेत. शेतकरी आत्महत्या करतोय. त्याला कुठलाही दिलासा नाही. शेतकरी प्रश्न महत्त्वाचा आहे. जमले तर तेथेही हेलिकाॅफ्टरने तत्काळ जा व मदत करा.

बातम्या आणखी आहेत...