आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई समाचार वृत्तपत्राच्या 200 वा वर्षपूर्ती सोहळा आज मुंबईत आयोजित करण्यात आला. या वेळी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती आहे. गुजराती महाराष्ट्रात दुधात साखर विरघळ्यासारखे राहतात, मुंबईत गुजराती वृत्तपत्र 200 वर्षे पूर्ण करते याचा अभिमान आहे. काही वृत्तपत्र चळवळीत जन्म घेतात आणि चळवळीनंतर ते बंद होतात असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी पेपर चालवणे किती अवघड आहे, असे सांगताना केसरी आणि मुंबई समाचार यांचे कौतुक केले आहे. केसरी आणि मुंबई समाचार इतिहासाचे साक्षीदार आहेत असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
देशीची भाग्यविधाता जनताच
देशाची भाग्यविधाता ही देशातील जनता आहे, मी केवळ या जनतेचा सेवक आहे. असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केले. गुजराती भाषेत जरी वृत्तपत्र असले तरी देशावादीच भूमिका आप घेतली,स्वातंत्र्यांच्या आंदोलनाला ही आपल्या वृत्तपत्राने दिशा दिली. अगदी सरदार वल्लभभाई पटेल हे देखील आपल्या वृत्तपत्राचा हवाला अनेक वेळा देत होते. हे सामान्यांचे वृत्तपत्र असल्याचे आजही दिसून येते असे पंतप्रधान मोदी म्हणाले. वेळोवळी होणारे बदल स्वीकारत वेळेसोबत कसे चालायचे हे आपल्या वृत्तपत्राने शिकवले असे म्हणत पंतप्रधानांनी वृत्तपत्राचे कौतुक केले आहे.
गुजराती पत्रकारिता महत्त्वाची
गुजराती पत्रकारिता स्वातंत्र्याच्या लढयात महत्त्वाची भूमिका पार पाडत होती, हे लढ्यातील महत्त्वाचे माध्यम होते. जे काम ज्याचे त्यांनीच करावे, मिडीयाचे काम आहे लोकांना शिक्षहत करावे, आणि सकारात्मक गोष्टींनाही तितक्या मोठ्या प्रमाणात लोकांपर्यत पोहचवावे. मिडीयाने लोकांना जागृत केले आहे. असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.