आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमध्ये दिलेल्या पाठिब्यांचे पडसाद आज विधानसभेत उमटले. मंत्री गुलाबराव पाटील यांनी नागालँडमध्ये पन्नास खोके, एकदम ओके झाल्याचा आरोप केला. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आक्षेप घेतला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका कशी दुटप्पी असल्याचे ते सांगितले. शिवाय काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकू नये, असे सूचक वक्तव्य केले.
बदलाचे वारे...
गुलाबराव पाटील म्हणाले, देशामध्ये आणि राज्यामध्ये बदलाचे वारे वाहायला लागले असे बरेच स्टेटमेंट पेपरामधून आणि टीव्हीतून बघतोय. नागालँडमध्ये राज्यातला जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी भाजपच्या फक्त मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिलेला आहे. फक्त मुख्यमंत्र्यांना. बदलाचे वारे पाहा कसे वाहायला लागले.
मांडीला मांडी लावून...
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, मला तरी असे वाटतेय की नागालँडमध्ये सुद्धा पन्नास खोके, बिलकुल ओके झालेय का. अशा पद्धतीची शंका या ठिकाणी निर्माण झालेली आहे. एकीकडे जातीयवादी सरकार म्हणून आरोप करायचे आणि तिकडे जाऊन मांडीला मांडी लावून बसायचे. आणि बदलाचे वारे कसे वाहायला लागले आहे. आमचे म्हणणे आहे की, पन्नास खोके नागालँड ओके, असे झालेय का. हा माझा सवाल आहे.
बदनामी करू नका...
अजित पवार म्हणाले की, प्रत्येक गोष्टीत राजकारणच आणले पाहिजे असे नाही. अध्यक्ष महोदय आज केंद्र सरकार त्यांच्या ताब्यात आहे. राज्य सरकार त्यांच्या ताब्यात आहे. सगळ्या संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. चौकशी करा ना, ही कुठली पद्धत काढली. केंद्र आणि राज्य सरकार तुमच्या हातात आहे. कारण नसताना बदनामी करू नका.
तिथली परिस्थिती वेगळी...
अजित पवार पुढे म्हणाले की, इशान्येच्या राज्यांची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. तिथे सगळे मिळून सर्वपक्षीय सरकार स्थापन करतात, अशी तिथली परंपरा आहे. भारतातला तो भाग, भारतातच राहण्यासाठी भारतीय म्हणून निर्णय घेतलेला आहे. त्याची चर्चा इथे करून गैरसमज निर्माण करायचा काहीच कारण नाही.
हे कुठले तत्वज्ञान...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तुम्ही दररोज येऊन खोके-खोके करता. आपण जेव्हा दुसऱ्याकडे बोट दाखवतो, तेव्हा तीन बोटे आपल्याकडे असतात. तुम्ही आतापर्यंत बदलाचे वारे वाहणार म्हणत होता. गुलाबराव पाटील यांनी हेच बदलाचे वारे का, असे विचारले. तुम्ही सरकारला नाही, मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला म्हणता. हे कुठले तत्वज्ञान, असा सवाल केला.
आपले ठेवायचे झाकून...
एकनाथ शिंदे म्हणाले की, सोयीचे तेवढे घ्यायचे. आपले ठेवायचे झाकून, दुसऱ्याचे बघायचे वाकून, हे कसे चालते. पवार जे-जे बोलले आहेत, त्याच्या नेमके उलटे झालेले आहे.एक कसब्याची पोटनिवडणूक जिंकली. मात्र, तीन राज्य भाजपने जिंकले, ते विसरले. सर्वसामान्य लोकांनी मुख्यमंत्र्यांना जागा दाखवली. पिंपरी चिंचवडमध्ये तुम्हाला दाखवली नाही. जसे नागालँडमध्ये झाले. मागितला नसताना पाठिंबा दिला. २०१४ ला ही तुम्ही तसे केले. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकत नसतात. आम्ही बोलत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.