आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएसटी आंदोलनावेळी चर्चेत आलेले ॲड.गुणरत्न सदावर्ते यांची दोन वर्षांकरिता वकीलीची सनद रद्द करण्यात आली आहे. ॲड. सुशील मंचरकर यांनी दाखल केलेल्या केस प्रकरणात सदावर्ते यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी वकिलाचा ड्रेस परिधान करून मुंबईत विविध आंदोलनात हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
सदावर्ते यांच्या सार्वजनिक ठिकाणी गाऊन घालण्याच्या कृत्यामुळे समस्त वकिलांची प्रतिमा मलिन होते, असे म्हणत वकील सुशील मंचरकर यांनी सदावर्ते यांच्या विरोधात शिस्त पालन याचिका दाखल केली होती. याबद्दल बार काउन्सिलच्या 3 सदसीय समितीने निकाल देत सदावर्ते यांची 2 वर्षांसाठी सनद रद्द केली आहे. हा गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का मानला जात असून यामुळे आता पुढील दोन वर्षे त्यांना वकिली करता येणार नाही.
ॲड. सुशील मंचरकर म्हणाले की, 2022 मध्ये ॲड.गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात बार कौन्सिलमध्ये तक्रार दाखल केली होती. नियम सात नुसार वकीलांनी सार्वजनिक ठिकाणी बँड किंवा गाऊन घालणे प्रतिबंध केले आहे. नियम 7 मध्ये असा नियम असताना आझाद मैदानावर त्यावेळी सुरू असलेल्या आंदोलनात गाऊन आणि बँड घालून आंदोलनस्थळी उपस्थित राहत, डान्स केला. यामुळे वकीलांची प्रतिमा डागाळली होती. रूलमुळे मी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होत. सुरुवातीला एक सदस्यीय समितीच्या सदस्यांनी 3 सदस्य असलेल्या समितीकडे निकालासाठी पाठविले आणि त्यानंतर आज त्यांनी हा निकाल दिला असल्याची माहिती ॲड. सुशील मंचरकर यांनी दिली
हे वृत्त आम्ही अपडेट करत आहोत....
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.