आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कल्याण:पंचवीस लाख रुपयांचा गुटखा पडकला

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कल्याण झोनच्या डीसीपी स्कॉडने कंटेनरमधून आलेला २५ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. मशाक इनामदार, लव सहानी, प्रेमचंद वाठोरे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

उल्हासनगर, अंबरनाथ व बदलापूर तसेच कल्याण व आसपासच्या शहरात कंटेनरच्या माध्यमातून लाखोंच्या गुटख्याची तस्करी केली जात आहे. भुशाच्या कंटेनरमधून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एका कंटेनरवर ही कारवाई केली आहे. कर्नाटकहून उल्हासनगरला शनिवारी रात्री कल्याण-गांधारीमार्गे गुटख्याचा कंटेनर येणार असल्याची माहिती कल्याण झोन ३ च्या डीसीपी स्कॉडला मिळाली होती.

बातम्या आणखी आहेत...