आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारची मोठी घोषणा:जिम, व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरू होणार; परंतु झुंबा, स्टीम, सौना बाथ बंदच : मुख्यमंत्री ठाकरें

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘एसओपी’नुसारच दसऱ्यापासून जिम, फिटनेस सेंटर्स, व्यायामशाळा चालणार

कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सक्तीने पालन करत राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स व व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरू करण्यास मान्यता दिल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. पण स्टीम बाथ, सौना, शॉवर व झुंबा, योगा असे सामूहिक व्यायाम प्रकार ‘एसओपी’ निर्देशानुसार बंद राहतील. मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिम, फिटनेस सेंटर्स व व्यायामशाळांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. जिम, फिटनेस सेंटर्स व व्यायामशाळेत कोरोना प्रतिबंधात्मक आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘एसओपी’चे काटेकोर पालन करण्याची ग्वाही या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना दिली.

दर तासाला निर्जंतुकीकरण करणे अनिवार्य

शारीरिक अंतर, हातांची स्वच्छता व मास्क वापरण्यासह मर्यादित प्रवेश, प्रशिक्षक, व्यवस्थाकीय अधिकारी यांची आरोग्य तपासणी करावी लागेल. व्यायामशाळेचे दरतासाला निर्जंतुकीकरण, उपकरणांत अंतर, वापरानंतर निर्जंतुकीकरण, दररोज रात्री जिम-व्यायामशाळा बंद झाल्यानंतर पूर्णपणे निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...