आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनलॉक:रविवारपासून केशकर्तनालये, सलून, ब्यूटी पार्लर उघडणार; कटिंगला मुभा, दाढीला कात्री!

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दाढी, फेशियलला मनाई, आधी अपाॅइंटमेंट घ्यावी लागणार

येत्या रविवारपासून केशकर्तनालय, सलून, ब्यूटी पार्लर उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी याबाबतची माहिती मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली. ३ महिन्यांपासून केशकर्तनालये बंद आहेत, ती उघडण्यास परवानगी द्यावी, अशी नाभिक समाजातून मोठी मागणी होती. रात्री उशिरा या संदर्भातील नियमावली जाहीर करण्यात आली. केशकर्तनालये सुरू करण्यास परवानगी दिली तरी अनेक नियम व अटी घातल्या आहेत. त्यानुसार केशकर्तनालय, ब्यूटी पार्लर, सलूनमध्ये जाण्यापूर्वी अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे.

दर दोन तासांनी दुकान सॅनिटाइझ करावे लागणार

- दुकान, पार्लरमधील खुर्च्या, टेबल, फरशी, व्हरंडा दर दोन तासांनी स्वच्छ करणे सक्तीचे.

- प्रत्येक ग्राहकासाठी स्वतंत्र डिस्पोजेबल टाॅवेल, नॅपकिनचा वापर करणे आवश्यक.

- प्रत्येक दाढी-कटिंगनंतर सर्व साहित्य सॅनिटाइझ आणि निर्जंतुक करणे अनिवार्य.

- दुकानात कोणत्या प्रकारची काळजी घेतली जाते यासंबंधी सूचना फलक लावावा लागणार

हे आहेत नियम व अटी

- कटिंग, हेअरडाय, वॅक्सिंग, थ्रेडिंगला परवानगी

- दाढीसह त्वचेशी संबंधित सेवांना मनाई. दुकानाबाहेर तसा बोर्ड लावणे बंधनकारक.

- प्रत्येक कारागिरास हातमोजे, मास्क आणि अॅप्रन घालणे अनिवार्य

हे सर्व नियम रविवार, २८ जूनपासून लागू होणार आहेत.

राज्यात अँटिबॉडीज चाचण्या

अँटिबॉडीज चाचण्या करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे कंटेनमेंट झोनमध्ये किती लोकांना संसर्ग झाला याची माहिती मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. शहरी भागात आरोग्य सेवेत समन्वय व्हावा यासाठी यापुढे शहर आरोग्य संचालक हे नवीन पद निर्माण करण्यात आले आहे.

खासगी रुग्णवाहिकांच्या दरांवर नियंत्रण

प्रत्येक जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणीकृत खासगी रुग्णवाहिकांची यादी केली जाईल. जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त या रुग्णवाहिका ताब्यात घेतील आणि त्यांचे प्रतिकिमी दर निश्चित होतील.

मेडिकल पीजीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा ठराव

वैद्यकीय शिक्षण पदव्युत्तर (पीजी) परीक्षा पुढे ढकलण्याचा ठराव राज्याच्या मंत्रिमंडळाने केला असून तो केंद्राकडे पाठवणार आहे. वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षा ऑगस्टमध्ये नियोजित आहेत.

- आता राज्यातील आशा स्वयंसेविकांना २००० रुपये कायमस्वरूपी मानधन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. गटप्रवर्तकांना ३००० रुपये मानधन देण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...