आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हज यात्रेवर संभ्रम:भारतीय हज कमिटीने म्हटले- सौदीच्या अधिकाऱ्यांकडून अद्याप अपडेट नाही; यात्रा रद्द करणाऱ्यांना मिळेल बुकिंगची पूर्ण रक्कम

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हज यात्रेवरून आता संभ्रम निर्माण झाले आहे. भारतीय हज समितीने सांगितल्याप्रमाणे, ज्यांना हज यात्रेची बुकिंग रद्द करायची असेल त्यांना संपूर्ण रिफंड दिला जाईल. यासाठी कॅन्सलेशन फॉर्म भरून हज कमिटीला ईमेल करता येईल. सोबतच, पासबुकची कॉपी किंवा कॅन्सल चेक सुद्धा या ईमेलला जोडावा लागणार आहे. हज यात्रा रद्द करू इच्छिणाऱ्यांना कॅन्सलेशन फॉर्म समितीच्या वेबसाइटवरून डाउनलोड करता येईल.

कोरोना व्हायरसचे वाढते संक्रमण पाहता सौदी अरेबिया सरकारने मार्चमध्ये सांगितले होते की यावर्षी हज यात्रा अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आली आहे. भारतीय हज कमिटीने सांगितल्याप्रमाणे, सौदी अरेबियाकडून अद्याप काहीच नवीन अपडेट मिळाले नाही. यासंदर्भात अनेक जणांकडून चौकशी केली जात आहे. त्यामुळे, ज्यांना हज यात्रा रद्द करायची आहे त्यांनी ती रद्द करून रिफंड घ्यावा असा निर्णय घेण्यात आला आहे.

यापूर्वी 1798 मध्ये रद्द झाली होती हज यात्रा

कोरोनामुळे जगभरातील धार्मिक स्थळांना बंद ठेवण्यात आले आहे. त्याचाच परिणाम सौदी अरेबियातील मक्का आणि मदीनावर सुद्धा दिसून येतो. यापूर्वी 1798 मध्ये हज यात्रा रद्द करण्यात आली होती. सौदी अरेबिया सरकारने 27 फेब्रुवारीपासून उमरा करण्यावर बंदी लावली होती. उमरा म्हणजे, हजची वेळ नसताना इतर वेळी हज करणे होय. ठराविक वेळी मक्का मदीनाची यात्रा करण्यास हज असे म्हटले जाते. गतवर्षी हज यात्रा करण्यासाठी सौदी अरेबियात 20 लाख लोक पोहोचले होते. सौदी अरेबियात दरवर्षी हज यात्रेतून 91,702 कोटी रुपये (12 अब्ज अमेरिकन डॉलर) ची कमाई झाली होती. हज यात्रा रद्द झाल्यास सौदी अरेबियासाठी हा आर्थिक फटका ठरू शकतो. कारण, महामारी आणि इतर कारणांमुळे आधीच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती घसरल्या आहेत.

0