आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात वाल्मीकी समाजातील मुलींवर अमानवीय अत्याचार केलेल्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा करा, या मागणीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रिपाइं नेते रामदास आठवले यांनी रविवारी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेतली.
बळी गेलेल्या मुलीच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार पोलिसांनी घाईगडबडीने करून मोठी चूक केली आहे. दलित अत्याचारांच्या प्रश्नांवर कोणीही राजकारण करू नये. दलित अत्याचार रोखण्यासाठी सवर्ण वर्गाकडून दलितांशी समतेने वागले पाहिजे. दलित-सवर्ण यांच्यातील सामाजिक दरी मिटली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. उत्तर प्रदेश सरकारतर्फे मुलीच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत मिळणार आहे. तसेच चांगले घर व २५ लाख रुपये सांत्वनपर निधी आणि घरातील एकास शासकीय नोकरी देण्यात येणार आहे, असे आठवलेंनी सांगितले.
आठवले हे स्वत:ला दलित चळवळीचे राष्ट्रीय नेते म्हणवतात. मात्र, हाथरस प्रकरणी त्यांनी मौन बाळगले होते . कंगना रनौत व पायल घाेष या अभिनेत्रींना न्याय मिळावा म्हणून ते राजभवनात जात हाेते. त्यामुळे आठवलेंवर आंबेडकरी चळवळीतून मोठी टीका झाली हाेती. त्यानंतर जाग आलेल्या आठवलेंनी थेट लखनऊ गाठत राज्यपालांची भेट घेतली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.