आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात भोंग्याचा मुद्दा तापलेला आहे. मनसेने 4 मेचा अल्टिमेटम दिला होता. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. दरम्यान, भोंग्याचा खरा मुद्दा नाहीच, तर रझा अकादमी आणि पीएफआयसारख्या विष पसरवणाऱ्या खरा संघटना असल्याचं मत भाजप आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केलं आहे.
नितेश राणे यांनी ट्वीट करत म्हटले की, लाऊडस्पीकर हा काही खरा प्रश्न नाहीये. खरा मुद्दा तर रझा अकादमी आणि पीएफआयसारख्या दहशतवादी संघटनांचा आहे, ज्या समाजात विष पसरवत आहेत. या सर्वांविरुद्ध एकत्र येऊन लढा देण्याची काळाची गरज आहे. सर्वांनी एकत्र येत त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी करावी, असेही ते म्हणाले.
आणखी एका ट्वीटमध्ये ते म्हणाले की, रझा अकादमी ही दहशतवादी संघटना आहे, जिची धर्मादायमध्ये साधी नोंदणीही नाही. नोंदणी नसतानाही ही संघटना सुरू आहे, त्यांचे सगळे धंदे थांबवले पाहिजेत. नोंदणी नसूनही राज्य सरकार त्यांना आंदोलने करू देते, त्यांना निधी कोण देतो? त्यांची सर्व कामे ताबडतोब थांबली पाहिजेत.
पुढे ते म्हणाले की, सच्चा मुस्लिम आपल्या राज्याविरुद्ध किंवा देशाविरुद्ध कधीही जाणार नाही. हिंदू आणि इतरांइतकेच त्यांचे त्यांच्या मातृभूमीवर प्रेम आहे. पण रझा अकादमी आणि पीएफआयसारख्या संघटना या समाजात द्वेष पसरवण्याचे काम करतात. अमरावती आणि नांदेडच्या दंगली याची उदाहरणं आहेत. हीच वेळ आहे त्यांना संपवण्याची!
दुसरीकडे, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी लाऊडस्पीकरबद्दल दिलेल्या अल्टिमेटला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यभरात यावरून पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळाला. काल राज यांनी आवाहन करून सर्वांना कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करण्याच्या सूचना दिल्या. अनेक ठिकाणी यावरून पोलिसांनी मनसैनिकांची धरपकडही केल्याचे वृत्त आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.