आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Hanuman Chalisa Of MNS; Youth Sena's Thalinad Against Inflation, MNS's Agitation In Ghatkopar And Sena's Agitation In Dadar Parle|Marathi News

आंदोलन:मनसेचे हनुमान चालिसा; युवा सेनेचा महागाईविरुद्ध थाळीनाद, घाटकोपरमध्ये मनसेचे, तर दादर-पार्लेमध्ये सेनेचे आंदोलन

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढा, नाहीतर त्याच्या दुप्पट लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा वाजवू, असा इशारा दिला होता. रविवारी (ता.३) घाटकोपरमध्ये मशिदीसमोरच्या झाडावर भोंगे लावून मनसेने हनुमान चालिसा वाजवली. पोलिसांनी लागलीच भोंगे काढून टाकले, तर दुसरीकडे शिवसेनेच्या युवा सेना कार्यकर्त्यांनी देशातील वाढत्या महागाईविरोधात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा निषेध म्हणून थाळी आंदोलन केले.

दादरच्या शिवाजी पार्कवर पाडव्यानिमित्त झालेल्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी मशिदीत पहाटेच्या अजानवेळी भोंगा लावला जातो तो बंद करावा, असे म्हटले होते. राजनी इशारा देताना आम्ही भोंग्याविरोधात दुप्पट लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा वाजवू असा इशारा दिला होता. रविवारी घाटकोपरमध्ये मनसे कार्यकर्ते रवींद्र भानुशाली यांनी मशिदीसमोर झाडावर दोन भोंगे लावले. त्यावर हनुमान चालिसा वाजवण्यात येत होती. तेढ वाढू नये म्हणून पोलिसांनी तत्परतेने कारवाई केली. दंड भरून पोलिसांनी मनसेचे भोंगे काढून टाकले. मात्र मनसे कार्यकर्ते भोंगे लावण्यावर ठाम आहेत.

मुंबईतील दादर, विलेपार्ले, माहिम, वांद्रे येथे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज वाढत्या महागाईविरोधात थाली बजाओ आंदोलन केले. रस्त्यावर बसून शेकडो युवा सेना कार्यकर्ते थाळी वाजवत होते. या आंदोलनात मोदी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विलेपार्ले येथे युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. कोरोना जसा थाळी वाजवून नरेंद्र मोदी यांनी पळवून लावला तशीच महागाईसुद्धा पळवून लावावी, असे वरुण देसाई या वेळी बोलताना म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...