आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

फडणवीस @50:मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, ट्विटरवर शेअर केला फोटो

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. आज फडणवीसांवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर खास फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. आज फडणवीसांचा 50 वा वाढदिवस आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून भाजप शिवसेना युती होती. मागच्या सरकारमध्ये तर शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार होते. मात्र यंदा शिवसेनेने भाजपशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा हात धरला. यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे राजकीयदृष्या दुरावले गेले. या दोघांकडून एकमेकांवर अनेक वेळा टीका टीप्पणी होत असते. देवेंद्र फडणवीस विरोधीपक्ष नेता म्हणून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. तर मुख्यमंत्र्यांकडूनही अनेक वेळा विरोधकांवर टीका केली जाते. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ईश्वर आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य देवो ही प्रार्थना,' असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.