आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आज नवीन वर्ष सुरू झाले आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुले पत्र लिहित राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. येणारे वर्ष आरोग्यदायी होण्यासाठी स्वयंशिस्तीचा निर्धार करा असे आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहित त्यांमध्ये कोरोनाचा आतापर्यंतचा प्रवास मांडत शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्र्यांनी पत्रात लिहिले की...
महाराष्ट्रातील जनतेने यंदाच्या वर्षी करोनाला पूर्णपणे हद्दपार करण्याचा आणि आपल्या वैयक्तिक आरोग्याबरोबरच इतरांच्या आरोग्याची काळी घेण्याचा संकल्प नवीन वर्षात करुयात. गेल्या वर्षभरात संपूर्ण जग करोनाशी लढा देत आहे. महाराष्ट्राने देखील लोकसहाभागामुळे अतिशय जबाबदार पद्धतीने करोनाची लढाई लढली आहे. आज आपण अनेक मार्गांनी कोरोना काहीशा प्रमाणात कमी करत आणला असला तरी येणाऱ्या वर्षात बेसावध न राहता आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणे महत्वाचे आहे.
एक नवीन जीवनपद्धती आपण शिकलो आहोत. यामध्ये मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हात स्वच्छ ठेवणे यासारख्या त्रिसूत्रीचा अवलंबं आपण करत आहेत. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शिक्षणासारख्या माध्यमातून तंत्रऊानाचा जास्तीत जास्त नाविन्यपूर्ण पद्धतीने उपयोग करत आहोत.
पुढील काळ कसा असेल याचा अंदाज बांधता येणे अवघड आहे. लस आपल्यापर्यंत येईल आणि ती सर्वांना मिळेल हा एक भाग झाला पण दरम्यान कोरोना विषाणूच्या बदलत्या रुपामुळे उद्धभवलेल्या परिस्थितीचाही आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल.
आपण पुनश्च: हरी ओम म्हणत सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरु करत आहोत. आथा आपल्याला मागे परतायचे नाही. करोनापासून स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर नियम आणि कायदे यापेक्षा आथा स्वयंशिस्त पाळणे याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल. विशेषत: नवीन पिढीवर याची जास्त जबाबदारी आहे. व्या वर्षात आपण जबाबदार नागरिक म्हणून सर्वांच्याच आरोग्याची काळजी घेण्याचा निर्धार मनोमन करणे गरजेचे आहे.
आपली आव्हाने कमी होणार नाहीत. शासन यंत्रणा कृतीशील आणि गतीमान आहे. नैसर्गिकं आणि माननिर्मिती संकटे नेहमीच येतात परंतू त्याचा सामना सावधपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने करुयात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.