आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानांवर आक्षेपार्ह वक्तव्य:दीपाली सय्यद यांच्यावर एफआयआर नाही, पण आपल्याला अश्लील फोटो पाठवले; भाजप सचिवाचा आरोप

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तक्रारीमुळे मॉर्फ फोटो व्हायरल करण्याची धमकी; भाजपा प्रदेश सचिव दिव्या ढोलेंचा दावा

पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांच्यावर FIR दाखल करावा, अशी तक्रार आम्ही ओशिवारा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. मात्र, 28 तारखेपासून दीपाली सय्यद यांच्यावर FIR दाखल झाला नाही, असा आरोप भाजपच्या प्रदेश सचिव विद्या ढोलेंनी पोलिसांवर केला आहे. काही दिवसांपूर्वी दीपाली सय्यद यांनी एक व्हिडिओ जारी करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. त्यावर भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

पोलिसांंकडून फक्त आश्वासन

भाजपच्या प्रदेश सचिव दिव्या ढोलेंनी बुधवारी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या म्हणाल्या की, आम्ही 28 नंतर पुन्हा 30 तारखेला संध्याकाळी 5.45 वाजता पोलिसांना एक तक्रारीचा अर्ज दिला त्यासोबतच फेसबुकवर आलेली क्लिप देखील पेनड्राइव्हमध्ये टाकून ओशिवारा पोलिसांकडे दिली. त्यानंतर आम्हाला पुन्हा पोलिसांकडून आश्वासन देण्यात आले, तुम्हाला रात्री फोन येईल, उद्या सकाळी फोन येईल, त्यानंतर FIR दाखल होईल, असे सांगितले. मात्र, त्यानंतरही आतापर्यंत FIR दाखल झालेला नाही.

घाणेरडे फोटो पाठवले

दिव्या ढोले म्हणाल्या की, 31 तारखेला सकाळी 9.30 वाजता माझ्या व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आला. त्यात माझाच फोटो मला दाखवण्यात आला. त्यात HI दिव्या असे लिहलेले होते, त्यानंतर मी त्याला "तुम्ही कोण आहेत" हे विचारले असता मला सांगण्यात आले की, "दोन मिनीट थांबा" त्यानंतर दोन मिनीटानंतर सात-आठ फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आले. ते फोटो अति घाणरडे होते ते पाहून मी देखील शॉक झाले. त्यात माझे फोटो मॉर्फ करून लावले होते. त्याखाली एक मेसेज होता, त्यात लिहले होते की, हा फोटोमधला जो माणूस आहे त्याने लोन घेतले असून, तुमचा नंबर दिला आहे. लोनचे पैसे जर त्याने परत पाठवले नाही तर तुमचे वर पाठवलेले फोटो व्हायरल करण्यात येईल, असे ढोले म्हणाल्या.

...म्हणून अश्लिल फोटो पाठवले

दिव्या ढोले म्हणाल्या, फोटो पाहिल्यानंतर दोन मिनीट मला काहीच कळाले नाही, कारण हा माणूस कोण? लोन घेणारा कोण? माझा कुणाशीही संबंध नाही. 4000 रुपये त्या माणसाने लोन घेतले होते. त्याला रिकव्हर करण्यासाठी मला असे मॅसेज येणे म्हणजे हे सरप्राइजिंग आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये असा स्कॅम सुरू आहे. रिकव्हरीवाले फोन करून मेसेज पाठवतात. 30 तारखेला 5.45 वाजता दीपाली सय्यद यांच्याविरोधात मी तक्रार दाखल करण्यासाठी ओशिवारा पोलिस ठाण्यात जाते. गेल्या तीन-चार दिवस सातत्याने भाजप आणि महिला मोर्चा दीपाली सय्यद यांच्याविरोधात तक्रार दाखल करावी, यासाठी भेटीगाठी घेत आहे. ज्या ठिकाणी ओशिवारा पोलिस ठाणे आहे त्याठिकाणी दीपाली सय्यद राहतात. दुसऱ्या दिवशी 9.30 वाजता माझ्या व्हॉट्सअॅप अति घाणरडे फोटो पाठवण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.

काहीतरी कनेक्शन

दिव्या ढोले म्हणाल्या, आम्ही शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांच्याविरोधात आवाज उठवला आहे. त्यांच्यावर तक्रार दाखल केली जात नाही. मला आलेले अश्लील मेसेज आणि दीपाली सय्यद तक्रार प्रकरणामध्ये काहीतरी कनेक्शन आहे. आमचा आवाज दाबवण्यासाठी हा प्रकार सुरू आहे. ते फोटो पाहिल्यानंतर मला झोप लागत नव्हती. त्यामुळे अखेर मला रात्री झोपीची गोळी घ्यावी लागली.

बातम्या आणखी आहेत...