आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हसन मुश्रीफ चौकशील हजर राहणार नाहीत:ईडी चौकशीला मुदतवाढ मागणार; नॉट रिचेबल झाल्यानंतर आता कागलमध्ये दाखल

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने तिसऱ्यांदा छापेमारी केल्यानंतर ते गेल्या 50 तासांपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर होते. मात्र, आता हसन मुश्रीफ कागलमध्ये दाखल झाले आहेत. आज कुटुंबियांची भेट घेणार असून ईडी चौकशी जाणार नसल्याचे सांगत महिनाभराची मुदतवाढ मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्या प्रकरणाशी माझा संबंध नाही त्या प्रकरणी मला समन्स देण्यात आला आहे. मात्र, मी ईडीला पूर्ण सहकार्य करणार असे मुश्रीफांनी स्पष्ट केले.

आरोप काय?

संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळाप्रकरणी मुश्रीफ यांच्या घराची ईडीकडून झाडाझडती घेतली जात आहे. कोलकात्यातील बोगस कंपन्यांमधून 158 कोटी रुपये या कारखान्यात ट्रान्स्फर झाले होते, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. हा पैसा आला कुठून? ही कंपनी आहे कुठे? हा मनी लॉन्ड्रिंगचा पैसा आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला होती. तसेच, या प्रकरणी मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर ईडीने मुश्रीफ यांच्याविरोधात कारवाईस सुरुवात केली आहे.

दीड महिन्यात दुसरी धाड

दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्या घरावर गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी धाड आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड पडल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व हसन मुश्रीफ यांचे समर्थक हसन मुश्रीफ यांच्या घरासमोर मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. या कारवाईविरोधात व केंद्र सरकारविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत आहेत. हसन मुश्रीफ सध्या घरी नाहीत. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनी या कारवाईविरोधात संताप व्यक्त केला आहे.

संबंधित वृत्त वाचा

आम्हाला गोळ्या घालून मारुन टाका!:ईडी कारवाईमुळे हसन मुश्रीफ यांच्या पत्नीला अश्रू अनावर, म्हणाल्या- किती त्रास देणार?

आम्हाला आणखी किती त्रास देणार? त्याऐवजी आम्हाला गोळ्या घालून मारुन टाका, अशी संतप्त प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांनी दिली आहे. वाचा सविस्त

बातम्या आणखी आहेत...