आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा नाहीच!:हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला, मनी लाँड्रिंग प्रकरण

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईडीकडून दाखल मनी लाँड्रिंग प्रकरणात आमदार हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेला जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला. अटकपूर्व जामीन नाकारल्यामुळे हसन मुश्रीफ यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
काय आहे सोमय्यांची तक्रार?

कोल्हापुरातील अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना लिलाव प्रक्रियेचे पालन न करता 2014 मध्ये ब्रिक्स इंडिया कंपनीला 10 वर्षांसाठी देण्यात आला. मुश्रीफ यांचे नातलग मतीन हसीन मंगोली हे या कंपनीचे बेनामी मालक आहेत. या कारखान्याचे 7185 शेअर्स एसयू कॉर्पोरेशन या शेल कंपनीकडे आहेत. या कंपनीद्वारे मुश्रीफ यांनी पैसे गुंतवले. कोल्हापूर येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात मुश्रीफ यांनी भ्रष्टाचाराचे पैसे गुंतवले. 19 व्यक्तींच्या नावे या कारखान्यात गुंतवणूक आहे. त्यात मुश्रीफ यांच्या कुटुंबातील अबिद हसन मुश्रीफ, नाविद हसन मुश्रीफ, साजिद हसन मुश्रीफ, नबिला हसन मुश्रीफ, सबिना साजिद मुश्रीफ, साहेरा हसन मुश्रीफ यांच्या नावे 13.30 कोटींची गुंतवणूक आहे.

मुश्रीफांनी काळा पैसा पांढरा करून (मनी लाँड्रिंग) शेल कंपन्यांद्वारे 78 कोटी 91 लाख रुपयांचे शेअर्स घेतले आहेत. रजत कन्झ्यमुर सर्व्हिसेस, माउंंट कॅपिटल, मरुभूमी फायनान्स अँड डेव्हलपर्स, नेक्टजेन कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, सरसेनापती शुगर्स आदी कंपन्यांचे हे शेअर्स आहेत.

जिल्हा बँकेचीही चौकशी

हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित नातेवाईक व्यवसायिकांवर यापूर्वीही ईडीने छापेमारी करत कारवाई केलेली आहे. आमदार हसन मुश्रीफ सध्या इडीच्या रडारवर आहेत. त्यांच्या निवासस्थानावर आतापर्यंत तीन वेळा छापेमारी करण्यात आली आहे. ते अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेचीही चौकशी सुरू आहे.