आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोटाळ्याचे आरोप प्रकरण:पवारांचा यात काय संबंध? त्यांच नाव घ्यायची लायकी आहे का? घोटाळ्याच्या आरोपांवरुन मुश्रीफांचा सोमय्यांवर पलटवार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मिळालेल्या सुपारीचं काम करा - मुश्रीफांचा टोला

भाजप नेते किरीट सोमय्या आणि ठाकरे सरकारमधील मंत्र्यांमध्ये सातत्याने खडाजंगी सुरु आहे. दरम्यान, आज पत्रकार परिषद घेत सोमय्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. सोमय्यांनी यावेळी हसन मुश्रीफ यांच्यावर आणखी काही गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांना हसन मुश्रीफ काय उत्तर देतात, याची सर्वांना उत्सुकता लागली होती.

याच पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. हा महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न असून यात शरद पवारांचा काय संबंध आहे? शरद पवारांच नाव घ्यायची लायकी आहे का? असा घणाघात मुश्रीफांनी सोमय्यांवर केला आहे. ते आज सोमय्यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

मिळालेल्या सुपारीचं काम करा - मुश्रीफांचा टोला
हसन मुश्रीफ बोलताना म्हणाले की, तुम्ही तक्रार दाखल केली आहे, मग तपास यंत्रणेला त्यांच काम करु द्या. तुम्ही तेथे जाऊन पर्यटन कशाला करता? तुम्ही काय न्यायाधीश झाले का? तुरंगात टाकणार, घोटाळेबाज असं म्हणण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. तुम्हाला जी सुपारी देण्यात आली आहे, ते काम करा. तपास यंत्रणांना त्यांच काम करु द्या असा सल्ला मुश्रीफ यांनी दिला आहे. तुम्ही आमची बदनामी करत आहात, ही बदनामी थांबवण्यासाठी मी न्यायालयात जाणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांनी आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांचे पुरावे गोळा करण्यासाठी मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कारखान्यावर जाणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या कोल्हापुरात आले तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता. त्यानंतर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचे चित्र निर्माण झाले होते. यामुळे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक आदेश जारी करत जमावबंदीचे आदेश जारी केले होते.

बातम्या आणखी आहेत...