आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हसन मुश्रीफांना हायकोर्टाचा तूर्तास दिलासा:दोन आठवडे अटकेची कारवाई करू नका, ईडीला दिले निर्देश

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांना हायकोर्टाकडून तूर्तास दिलासा मिळाला आहे. ईडीच्या प्रकरणात पुढील दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान हसन मुश्रीफांना मुंबई सत्र न्यायालयात रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करण्याचे निर्देश देण्यात आले असून सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाने या अर्जावर तातडीने सुनावणी पूर्ण करण्याचे हायकोर्टाने म्हटले आहे. तर गुन्हा रद्द करण्यासाठीच्या याचिकेवरील सुनावणी तूर्तास तहकूब करण्यात आली आहे.

दीड महिन्यात दुसरी धाड

दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्या घरावर गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी धाड आहे. त्यामुळे मुश्रीफ यांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यानंतर मुश्रीफ यांनी कोर्टात धाव घेतली होती. आता कोर्टाने त्यांना दिलासा दिला आहे. मात्र शनिवारपासून ईडीचे अधिकारी कागलमध्ये मुक्कामी आहेत. यामुळे त्यांना अटक होणार नसली तरी त्यांची चौकशी सुरु राहणार आहे. कारण शनिवारच्या छाप्यानंतरही ईडी अधिकारी कोल्हापुरातच आहे. यामुळे मुश्रीफांच्या अडचणी वाढणार आहेत.

आरोप काय?

संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळाप्रकरणी मुश्रीफ यांच्या घराची ईडीकडून झाडाझडती घेतली जात आहे. कोलकात्यातील बोगस कंपन्यांमधून 158 कोटी रुपये या कारखान्यात ट्रान्स्फर झाले होते, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. हा पैसा आला कुठून? ही कंपनी आहे कुठे? हा मनी लॉन्ड्रिंगचा पैसा आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला होती. तसेच, या प्रकरणी मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर ईडीने मुश्रीफ यांच्याविरोधात कारवाईस सुरुवात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...