आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

35 कोटींचे मनी लाँड्रिंग प्रकरण:हसन मुश्रीफांच्या 3 मुलांचा अटकपूर्ण जामीन अर्जावर सुनावणी पुढे ढकलली, इडीकडून तूर्त कारवाई नाही

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काॅंग्रेस माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्ण जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली आहे. तूर्तास मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांविरोधात कारवाई करणार नसल्याचे ईडीकडून सांगण्यात आले. ईडीकडून मुश्रीफ यांच्याविरोधात 35 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या तिन्ही मुलांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

इडीकडून जामीनाला विरोध

हसन मुश्रीफ यांची मुले नाविद, आबिद आणि साजिद यांच्या अटकपूर्व जामीनाला ईडीकडून विरोध करण्यात आला आहे. मुश्रीफ यांच्या मुलांच्या वतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा, अमित देसाई आणि प्रशांत पाटील बाजू मांडत आहेत. मुलांकडून राजकीय हेतूने अटकेच्या धमक्यांचा वापर होत असल्याचे म्हटले आहे. ईडीने तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीनाला विरोध करताना त्यांनी चौकशीमध्ये कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नसल्याचे नमूद करण्यात आले. तसेच चौकशीसाठी समन्स बजावूनही ते हजर झालेले नाहीत. जामीन दिल्यास चौकशीवर परिणाम होईल, असा दावा ईडीने केला आहे.

मुश्रीफांची उच्च न्यायालयात धाव

मुरगूड पोलीस ठाण्यात हसन मुश्रीफांवर दाखल झालेला गुन्हा रद्द व्हावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात हसन मुश्रीफ यांनी धाव घेतली. ईडी प्रकरणात गोवण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी दाखल केलेल्या याचिकेतून केला आहे. याचिकेवर सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोणतीही कारवाई तसेच आरोपपत्र दाखल करू न देण्याची याचिकेत मागणी करण्यात आली आहे.

मुरगूड ठाण्यातील प्रकरण काय?

हसन मुश्रीफांविरोधात 40 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप करत 23 फेब्रुवारी रोजी मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक कुलकर्णी यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. हा माझ्याविरोधात कट असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींवरून ईडी प्रकरणात अडकवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...