आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1500 कोटींचा घोटाळा:हसन मुश्रीफांनी जावयाला बेकायदा कंत्राट दिल्याचा आरोप, लोकायुक्तांसमोर 24 ऑगस्टला सुनावणी

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ हे ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी आपल्या जावयाला 1500 कोटी रुपयांचे कंत्राट बेकायदा पद्धतीने मिळवून दिले, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणाची लोकायुक्तांसमोर 24 ऑगस्टरोजी सुनावणी होणार आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. याबाबत लोकायुक्तांचे पत्रही त्यांनी ट्विट केले आहे.

किरीट सोमय्या यांनी सांगितले की, हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांनी 1500 कोटी रुपयांच्या या कंत्राटाच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार केला आहे. या घोटाळ्याची आता लोकायुक्तांद्वारे चौकशी सुरु झाली आहे. त्यामुळे मंत्रि असताना हसन मुश्रिफ यांनी काय भ्रष्टाचार केला, याचा हिशोब त्यांना द्यावाच लागेल. दरम्यान, यापूर्वी किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रिफ लवकरच तुरुंगात जाणार असल्याचेही सांगितले होते.

नेमका काय आहे घोटाळा?

ग्रामविकास मंत्री असताना हसन मुश्रीफ यांनी त्यांचे जावई मतीन मंगोली यांच्याशी संबंधित मेसर्स जयोस्तुते मॅनेजमेंट या कंपनीस राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचे जीएसटी, टीडीएस रिटर्न्स भरण्यासाठी कंत्राट दिले होते. जवळपास 1500 कोटी रुपयांचे हे कंत्राट होते. नियमबाह्य पद्धतीने मुश्रीफ यांनी स्वत:च्या जावयाला हे कंत्राट दिले, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.

किरीट सोमय्या यांनी सांगितले की, या प्रकरणाची सुनावणी 24 ऑगस्टरोजी लोकायुक्तांसमोर ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिवही या बैठकीला हजर राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...