आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हाथरस प्रकरणावर सुप्रिया सुळे:उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य राहिले नाही, योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा - सुप्रिया सुळे

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उत्तर प्रदेश सरकार काहीतरी लपवत आहे, सुप्रिया सुळेंचा आरोप

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे. आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेश सरकार काहीतरी लपवत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे. यासोबतच राहुल गाधींना जी वागणुक मिळाली त्याचाही निषेध केला आहे.

यूपी सरकार काही तरी लपवत आहे

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत जे घडले यासोबतच ज्या पद्धतीची वक्तव्ये जिल्हा दंडाधिकारी आणि इतर करत आहेत त्यावरुन उत्तर प्रदेश सरकार काहीतरी लपवत असल्याचे सिद्ध होत असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. तसेच त्या म्हणाल्या की, देशात अराजकता माजली आहे. उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये मुली या सुरक्षित नाहीत.यासोबतच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरस येथे गेल्यानंतर त्यांच्यासोबत जसे वर्तन करण्यात आले. या बद्दल योगी आदित्यनाथ यांनी स्वतःची चूक मान्य करावी.

योगींनी राजीनामा द्यावा
सुप्रिया सुळे यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहेत. त्या म्हणाल्या की, गेल्या दोन दिवसांमध्ये उत्तर प्रदेशात बलात्काराच्या तीन घटना समोर आल्या आहेत. राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांनी यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याची चौकशी करण्याची विनंती मी पंतप्रधानांना करते. तसेच जर योगी सरकार हे राज्यातील महिलांची सुरक्षा करण्यास सक्षम नसेल तर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.