आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्ञानदेव वानखेडेंना दिलासा नाहीच:हायकोर्टाने म्हटले- मलिकांना वानखेडेंवर बोलण्यापासून रोखले जाऊ शकत नाही, पण त्यांनी भविष्यात 'या' गोष्टीचे भान ठेवावे

मुंबई5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडेंना दिलासा देण्यास हायकोर्टाने सोमवारी नकार दिला. समीर वानखेडे यांच्याबाबत रोज नव-नवीन वक्तव्ये करण्यापासून नवाब मलिकांना रोखले जाऊ शकत नाही असे हायकोर्टाने स्पष्ट केले. यासोबतच, नवाब मलिक यांना एक सल्ला देखील दिला आहे.

ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. तसेच मलिकांच्या रोज-रोजच्या वक्तव्यांमुळे कुटुंबियांची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे, मलिकांना या विषयावर बोलण्यापासून रोखण्यात यावे अशी विनंती समीर वानखेडेंच्या वडिलांनी केली होती. त्यावरच सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये हायकोर्टाने मलिकांना बोलण्यापासून रोखण्यास नकार दिला.

न्यायालयाच्या या निर्देशांवर नवाब मलिक यांनी ट्विट करून पुन्हा समीर वानखेडेंना चिमटा घेतला आहे.

भविष्यात भान ठेवा, मलिकांना कोर्टाची तंबी
हायकोर्टाने सोमवारी झालेल्या सुनावणीत म्हटले आहे, की नवाब मलिक यांची विधाने योग्य पद्धतीने तपासून करण्यात आलेली नाहीत. त्यांनी भविष्यात या गोष्टीचे भान ठेवावे. तसेच दोन आठवड्यात नवाब मलिक यांनी आपले उत्तर सादर करावे असेही न्यायालयाने म्हटले आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 डिसेंबरला होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...