आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वयंघोषित हिंदूजननायक असे जाहीर करून ताम्रपट मिळत नाही, अशा शब्दात शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे. दीपाली सय्यद यांनी पुन्हा राज ठाकरेंवर टीका केली आहे. याआधीही त्यांनी अनेकदा राज ठाकरेंना लक्ष्य केले आहे.
दिपाली यांनी ट्विटमध्ये म्हटले की, अमित ठाकरे यांना नोटीस पाठवली नाही ही उद्धव साहेबांची मेहरबानी राज साहेबांनी विसरू नये, सहनशीलता ही निवडणुकीत दाखवायची असते. स्वयंघोषित हिंदुजननायक करून ताम्रपट मिळत नाही.
राज ठाकरेंनी 10 मे रोजीए क पत्र लिहिले होते. त्या पत्रात त्यांनी म्हटले होते की, सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही जन्माला आलेलं नसतं, उद्धव ठाकरे तुम्हीही नाही. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका.
राज ठाकरेंना टोला -
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा असून या सभेला कोणीतरी विजयी भव असा आशीर्वाद दिला आहे. आजवर त्यांना कुठेही विजय मिळालेला नसून आतातरी विजय मिळू देत असा टोला दिपाली सय्यद यांनी लगावला होता.
कोण आहेत दिपाली सय्यद?
अभिनेत्री दिपाली सय्यद ही विविध राजकीय वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. दिपाली सय्यद या अभिनेत्री असून त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी मालिका, जाहिराती तसंच सिनेमांमध्ये काम केले आहे. 2014 साली त्यांनी आम आदमी पक्षाकडून अहमदनगर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली. पण त्यात त्यांना अपयश आले. यानंतर आपला रामराम ठोकत त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे कळवा - मुंब्रा मतदारसंघातून दिपाली भोसले - सय्यद यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण, या निवडणुकीतही त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.