आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदावर्ते अयोध्येला जाणार:म्हणाले- मला रोखण्यासाठीच पोलिस चौकशीचा फेरा लावला; अयोध्येला जाण्यापासून कोणताच कायदा रोखू शकत नाही

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सदावर्तेंना मुंबईचे गावदेवी पोलिसांची नोटीस आज होणार चौकशीची

मी लवकरच अयोध्येत जाणार आहे. हे ऐकुन राज्य सरकारच्या पायाखालची वाळु सरकली असेल. मला रोखण्यासाठीच पोलिसांनी चौकशीचा घाट घातला आहे; पण मला अयोध्येला जाण्यापासून देशातील कोणताच कायदा रोखु शकत नाही असा खणखणती इशारा वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिला.

एसटी कामगार संघटनेच्या आंदोलनातील नेते आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांना गावदेवी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यानंतर आज (ता. 11) काही वेळातच गुणरत्न सदावर्ते गावदेवी पोलिस ठाण्यात हजर राहणार आहेत. त्यापुर्वी त्यांनी आपले मत व्यक्त केले.

सदावर्ते ंम्हणाले, राम जन्म भुमी प्रकरणात वकील होतो. आम्हाला अयोध्येत स्वागत करुन बोलावले जात आहे, त्यामुळे आम्ही लवकरच अयोध्येत जाणार आहोत. आम्ही राज्यसत्तेच्या शक्तीला घाबरत नाही. मला अयोध्येत जायचे असल्याने राज्य सरकारच्या पायाखालची वाळु सरकणार आहे असेही सदावर्ते म्हणाले.

मला कुणी रोखु शकत नाही

कष्टकरी जनसंघ हे हिंदुस्तान आणि महाराष्ट्राला सुजलाम -सुफलाम करणार आहे. अयोध्येला जाण्यासाठी देशातील कोणताही कायदा रोखु शकत नाही या महिण्याच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही अयोध्येचा दौरा करु असेही गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

राजकीय हेतूने नोटीस -सदावर्तेंचे वकील

कलम 110 अंतर्गत सदावर्तेंना नोटीस गावदेवी पोलिसांनी दिली आहे. आमच्यावरील गुन्हा खोटा दाखल झाला, पोलिसांनी चार्जशिट दाखल केली नाही कोर्टात ट्रायलही झाले नाही असे सदावर्तेंच्या वकीलाचे म्हणणे आहे. सदावर्ते डेंजरस माणूस असे नोटीसमध्ये नमुद आहे, आज दुपारी आम्हाला राजकीय हेतूने नोटीस बजावली आहे.

बातम्या आणखी आहेत...